Ajit Pawar, Atul Benke sarkarnama
पुणे

Manchar NCP News : मंचरच्या मेळाव्यात अतुल बेनकेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, दादांना शपथविधीसाठी...

Atul Benke मंचर (ता. आंबेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार बेनके बोलत होते.

डि के वळसे-पाटील

Manachar NCP News : “उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हा सच्चा माणूस असून त्यांच्याकडे प्रचंड निर्णय क्षमता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी एखादा निर्णय घेतला तर दोन दिवसानंतर तो निर्णय ते बदलत नाहीत. पहाटे दादांचा झालेला शपथ विधी सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरच झाला होता. दादा गेले नव्हते, दादांना शपथविधीसाठी पाठविले होते,” असा गौप्यस्फोट जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केला आहे.

मंचर (ता. आंबेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार बेनके बोलत होते. यावेळी त्यांनी अजितदादांच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. पहाटेच्या शपथविधी विषयी बोलताना बेनके म्हणाले. “आम्हाला निरोप आल्यानंतर आम्ही सर्वजण यशवंतराव चव्हाण सेंटरला पोहोचलो. त्यानंतर काय, काय झालं, आपल्याला माहित आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. दादांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले.

यापूर्वी ही काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त होती. त्यावेळी ही दादांना मुख्यमंत्री करता आले असते. पण, त्यांना उपमुख्यमंत्री केले गेले. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा उल्लेख युवराज असा करत आमदार बेनके म्हणाले, "काळू नदीतील पाणी पिंपळगाव जोगा धरणातून कर्जतला पाणी देण्यासाठी, तसेच हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) धरणातून नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, आमदार रोहित पवार तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मी व वळसे पाटील यांनी धरणाच्या तळापासून होणाऱ्या बोगद्याला विरोध केला होता. पण, युवराज सांगतात ते पूर्णपणे खोटे आहे. आंबेगाव व जुन्नरचाया पाण्यावर पहिला हक्क आहे. दिलीप वळसे-पाटील व माझ्या छातीवर गोळ्या झाडा. पण थेंबभरही पाणी देणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुलैअखेरपर्यंत याभागाला पाणी मिळेल असे नियोजन केले आहे. अजित पवार यांच्यामुळे आपले पाणी वाचले आहे. पिंपरी पेंढार येथे वीस एकर क्षेत्रात सौर उर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. त्यातून चार मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. अजून ही सौर उर्जा प्रकल्प उभे राहणार आहेत. त्यामुळे बिबट क्षेत्रात दिवसा वीज मिळेल, असेही त्यांनी नमुद केले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT