jay pawar, ajit pawar  Sarakarnama
पुणे

Baramati Bypoll : अजितदादांच्या स्टाईलमध्येच जय पवारांनी लावला एक कॉल अन् समस्या चुटकीसरशी सॉल्व्ह!

Political News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक लागली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्या आहेत. कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाने त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा सामना हा अपक्षांशी होणार आहे.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासमोर कोणताही कठीण आव्हान या निवडणुकीमध्ये नसले तरी पवार कुटुंबाकडून भेटीगाठी, गाव दौरे, कोपरा सभा यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. या प्रचारात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार हे मोठ्या प्रमाणात प्रचार करत असून त्यांनी गाव भेटींचा सपाटा लावला आहे.

रविवारी देखील जय पवार यांनी तब्बल वीस गावांना भेटी दिल्याचे पाहायला मिळाले. या दौऱ्या दरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि कार्यकर्त्यांनी देखील जास्तीत जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणावे, असे आवाहन केले आहे.

या गावभेट दौऱ्यावर असताना जय पवार यांनी भिकोबा नगर येथील अनाथ मुलांच्या शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती.

याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ज्या पद्धतीने अजित पवार हे कोणतेही समस्या ऑन द स्पॉट सोडवायचे त्याच पद्धतीने जय पवार यांनी देखील समस्या मार्गी लावल्याचा पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT