Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati News : अजितदादांच्या सूचनेवरुन चौघांनी दिले राजीनामे.. ; नवीन चेहऱ्याला संधी

Baramati Co-operative Bank News : राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Baramati Co-operative Bank News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांच्या सूचनेवरून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी राजीनामे दिले आहेत.

बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संचालक मंडळाच्या पुनर्रचनेसाठीच अजित पवार यांनी हे राजीनामे घेतले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदी सचिन सातव हे कायम राहतील मात्र उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.

अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बारामती सहकारी बँकेने भरीव कामगिरी करत बँकेचा एनपीए लक्षणीयरीत्या खाली आणला व बँकेला यंदा चांगला नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बँकेचे उपाध्यक्षपदी यंदा महिला संचालिकेस स्थान मिळणार का याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.बारामती सहकारी बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी गेले वर्षभर सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अथक परिश्रम केले होते. बँकेने यंदा सात कोटी नव्वद लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.

बारामती सहकारी बँकेने ३१ मार्च अखेर ३६३२ कोटींचा एकूण व्यवसाय करत ५३. २९ कोटींचा तरतूदीपूर्व ढोबळ नफा मिळविला आहे. आजवरच्या ढोबळ नफ्यात हा विक्रमी नफा आहे. सर्व तरतूदी पूर्ण करत बँकेने ७.९० कोटींचा निव्वळ नफा मिळविला. बँकेचे नक्त मुल्य १२८ कोटींवर पोहोचले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसूली करून अनुत्पादक जिंदगी (एनपीए) चे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT