BJP foundation day : भाजप स्थापना दिनी मोदी आणि शाह यांचा आडवाणींसोबतचा 'तो' फोटो व्हायरल.. नेटकरी म्हणतात..

BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani : भाजपला केंद्रात मोठे यश मिळाल्यानंतरचा हा फोटो असल्याचे सांगण्यात येते.
BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani
BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani Sarkarnama

BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani : भारतीय जनता पक्षाचा ४३ वा वर्धापनदिन आज (गुरुवारी) देशभर साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या वर्धापन दिनी नेते, पदाधिकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून आपलं मतदार संघातील वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सोशल मीडियावर कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत आहेत. यात एका फोटोनं सगळ्याचे लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हा फोटोची नेमकं वर्ष कुठलं याबाबत मतभेद असले तरी या बोलक्या छायाचित्रानं भाजप समर्थकांसह अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

१९८४ रोजी लोकसभेच्या दोन जागा जिंकणारी पार्टी आज ३०० जागा जिंकून सत्तेत आहे. ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली. तेव्हा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे अखिल भारतीय विद्यार्थी(ABVP)परिषदेत सक्रिय होते. १९८७ मध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह हे दोन्ही नेते भाजपमध्ये सामील झाले . आज भाजपच्या वर्धापन दिनी मोदी, शाह आणि लाल कृष्ण आडवाणी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani
Uddhav Thackeray : ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय ? ; फडतूस नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?

'इंडिया हिस्ट्री पिक्स' नावाच्या टि्वटर हॅडलवरुन हो फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यात म्हटलं आहे. हा फोटो १९८० च्या दशकातील आहे. तर इंडियाटाइम्स डॉट कॉम ने हा फोटो १९८९ मधील असल्याचे म्हटलं आहे.

या फोटोमध्ये लाल कृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी बसलेले आहेत. तर मोदींच्या पाठिमागे अमित शाह उभे आहेत. ते टेबलावरील कागदपत्रे पाहत आहेत. भाजपला केंद्रात मोठे यश मिळाल्यानंतरचा हा फोटो असल्याचे सांगण्यात येते.

BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani
Congress मधील सर्वात खराब अध्यक्ष कोण ? ; गुलाम नबी आझादांचा मोठा गौप्यस्फोट

या फोटोच्या दोन वर्षापूर्वी अमित शाह आणि नरेंद्र मोदी अभाविपमधून भाजपमध्ये सामील झाले होते. तेव्हा शाह यांची अहमदाबाद भाजपचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती,तर मोदी हे गुजरात भाजचे महासचिव होते.

BJP Foundation Day Photo of Lal Krishna Advani
Himanta Biswa Sarma News: 'कॉपी पेस्ट सीएम' वरुन मुख्यमंत्र्यांची कबुली ; नेटकऱ्याने हिणवलं, video व्हायरल...

वर्ष लोकसभा निवडणुकीतील मते

1984 1.82 कोटी

1989 3.41 कोटी

1991 5.53 कोटी

1996 6.79 कोटी

1998 9.42 कोटी

1999 8.65 कोटी

2004 8.63 कोटी

2009 7.84 कोटी

2014 17.1 कोटी

2019 22.9 कोटी

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com