Sharmila Pawar-Supriya Sule
Sharmila Pawar-Supriya Sule Sarkarnama
पुणे

Sharmila Pawar News : लोकसभा निवडणूक आम्हा (पवार) कुटुंबीयांसाठी अत्यंत दुःखदायी; शर्मिला पवारांनी मांडल्या भावना

दत्ता जाधव

Pune, 22 March : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. नणंद-भावजयमधील लढतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारही राजकीय मैदानात उतरले आहेत. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सध्याच्या निवडणुकीबाबत नेमक्या भावना मांडल्या आहेत. सध्याची लोकसभेची निवडणूक ही आम्हा (पवार) कुटुंबीयासाठी अत्यंत दुःखदायक असून, कोणीही जिंकले तरी आनंद नाही, अशा शब्दांत पवार कुटुंबातील सद्यःस्थितीवर भाष्य केले.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या प्रचारार्थ पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. त्या म्हणाल्या, सध्याची लोकसभेची निवडणूक ही आम्हा (पवार) कुटुंबीयांसाठी (Pawar Family) अत्यंत दुःखदायक आहे. या निवडणुकीत विजय कोणाची ही झाला तरी आनंद नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहरवाशीणला आपण नेहमी खणा-नारळाने ओटी भरून पाठवतो. आपली माहेरवाशीण सुप्रिया सुळे यांची कामगिरी दमदार आहे, त्यामुळे आपण आपल्या मुलीचा मान ठेवायचा की पराभूत करायचे, हे तुम्ही ठरवायचे आहे, असे सांगून शर्मिला पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण केलेल्या कामाचा कधीही गवागवा केलेला नाही. मात्र, काही लोक काम न करता फक्त गवगवाच करतात. आपल्या खासदार सुप्रिया सुळे यांची कामगिरी अत्यंत दमदार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळून संसदेत पाठवायचे आहे, असेही शर्मिला पवार म्हणाल्या.

या वेळी अक्षसृष्टी संस्थेचे प्रमुख सिद्धनाथ पवार यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात झालेल्या कामांची माहिती दिली. तसेच, सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. माळशिरस येथील बैठकीला सरपंच आरती यादव, माऊली यादव, पुष्कराज जाधव, अरुण यादव, संतोष गिरमे, एकनाथतात्या यादव, लक्ष्मण महाराज यादव, सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव डोंबाळे आदी उपस्थित होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT