kolhe Vs Adhalrao : एकनिष्ठ विरुद्ध बेडूकउड्या...अमोल कोल्हेंनी कुठल्या निवडणुकीचं केलं वर्णन!

Loksabha Election 2024 : केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर जे झुकत नाहीत, त्यांचा केजरीवाल केला जातो आणि जे झुकतात त्यांना एका वॉशिंग मशीनमध्ये घालून सत्तेत सामील करून घेतले जाते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केला.
Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Amol kolhe-Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Pimpri, 22 March : शिरूर लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे या वेळी अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उतरणार आहेत. त्यांच्या या चौथ्या पक्षप्रवेशाला शिरूरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा देत चिमटा काढला. हाच धागा पकडून त्यांनी शिरूरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूकउड्या अशी होणार आहे, असा टोला मारला.

शरद पवार यांनी शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर केल्यापासून ते मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा गुरुवारी (ता. 21 मार्च) दौरा केला. त्या दौऱ्यात राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी एखादा योद्धा शरण येत नाही, तेव्हा त्याला बदनाम केलं जातं, अशी प्रतिक्रिया `ईडी`ने मद्य धोरण घोटाळ्यातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेवर दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Pawar on Kejriwal Arrest : केजरीवाल यांच्या अटकेची सरकारला किंमत मोजावी लागेल; पवारांचा कडक इशारा

केंद्रातील सत्ताधारी भाजपसमोर जे झुकत नाहीत, त्यांचा केजरीवाल केला जातो आणि जे झुकतात त्यांना एका वॉशिंग मशीनमध्ये घालून सत्तेत सामील करून घेतले जाते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केला. शरण जाण्यापेक्षा लढणं पत्करणाऱ्या केजरीवालांचे त्यांनी कौतुक केलं.

मोदी गॅरंटी ही देशाची दिशाभूल असल्याची टीका कोल्हे यांनी या वेळी केली. अब की बार, चार सो पार, म्हणता. मग दोन पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी) का फोडता, तिसऱ्या पक्षाचे (कॉंग्रेस) नेते का पळविता, अशी खोचक विचारणा अमोल कोल्हे यांनी केली. हे कमी म्हणून की काय मनसे नेत्यांच्याही गाठीभेटी घेणाऱ्या भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Dindori Lok Sabha Constituency : महाआघाडीला स्थिती अनुकूल, तगडा उमेदवार द्या; सहकारी पक्षांनी टोचले राष्ट्रवादीचे कान!

आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पराभवासाठी अजित पवारांना एवढी मोठी ताकद उभी करावी लागल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष असूनही त्यांना एखाद्या आमदाराची (आढळरावांच्या राष्ट्रवादीकडूनच्या उमेदवारीला विरोध करणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी यावे लागणे, ही परिस्थिती खूप बोलकी आहे, ती सारेकाही सांगून जात आहे, अशी कोपरखळी त्यांनी परवाच्या अजितदादा आणि मोहितेंच्या भेटीवर मारली.

Edited By : Vijay Dudhale

R

Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Solapur Loksabha constituency : सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुते फायनल; दोन युवा आमदारांमध्ये होणार लढत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com