Sunanda Pawar, Supriya Sule, Ajit Pawar sarkarnama
पुणे

Baramati Loksabha News : सुनंदा पवारांनी स्पष्टच सांगितलं; शेवटच्या दोन, तीन दिवसांत धनशक्तीचा वापर होणार...

Sharad Pawar Family बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने आल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात संघर्ष वाढला आहे.

सरकारनामा ब्युरो

Baramati Loksabha News : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार अशी कुटुंंबातच लढत होत आहे. आज बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत सुनंदा पवार यांनी सूचक वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, प्रत्येक गावात अनोळखी लोकं फिरताना दिसत असून शेवटच्या दोन, तीन दिवसांत धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल, असा दावा त्यांनी केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात संघर्ष वाढला आहे. अजित पवार यांचं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील इतर सर्व सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच घेरल्याचे चित्र आहे.

सुपे गावात झालेल्या सभेत आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या सहभागी झाल्या होत्या. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात सूचक वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, आज बारामतीच्या प्रत्येक गावात अनेक अनोळखी लोकं फिरताना दिसत आहेत. काहीजण वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल, असा दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पवार कुटुंबामध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. काही आठवड्यांपासून अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर अजित पवार आक्रमक झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आमचे थोरले बंधू लोकांची दिशाभूल करत असून, रोहित पवार यांना हडपसरमधून निवडणूक लढवायची होती. तेव्हा ते माझ्याकडे आले होते. मात्र, पवार साहेबांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर प्रतिभाकाकींनी रोहितला काही सल्ले दिले होते.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT