Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Baramati Namo Rojgar Melava : ...तर आमची सरकारला साथ असेल; शरद पवारांनी दिली ग्वाही

Sharad Pawar Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याचे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करताना मला आनंद आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये तब्बल ३५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. रोजगारासंदर्भात हा कार्यक्रम होत आहे. रोजगाराच्या प्रश्नात राज्य सरकारने लक्ष घातले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

Vijaykumar Dudhale

Baramati News : राजकारण हे होत असतंच. पण, जिथं नव्या पिढीला आधार देत आहोत, अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सहकार्य केले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो की, मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी जे जे तुम्ही कराल, त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची तुम्हाला साथ राहील, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

बारामती (Baramati) येथे आज कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बारामतीत आज आणि उद्या हा रोजगार मेळावा होणार आहे. त्या मेळाव्याला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारला साथ देण्याची खात्री दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, मंगल प्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, दत्तात्रेय भरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याचे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करताना मला आनंद आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये तब्बल ३५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. रोजगारासंदर्भात हा कार्यक्रम होत आहे. रोजगाराच्या प्रश्नात राज्य सरकारने लक्ष घातले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

विद्या प्रतिष्ठानमधून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, यासाठी एक विभाग स्थापन केला आहे. त्या विभागाच्या माध्यमातून विद्या प्रतिष्ठानमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच वर्षांत २५०० विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली आहे. तसेच, आर्टिफिशयल इंटिजेलन्स महाविद्यालय आम्ही सुरू केले आहे. पुढच्या वर्षापासून हे महाविद्यालय नव्या वास्तूत सुरू होईल, असेही पवार यांनी नमूद केले.

शरद पवार म्हणाले, राजकारण हे होत असतंच. पण, नव्या पिढीला आधार देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, त्या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य केले पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो की, मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी जे जे तुम्ही कराल, त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची तुम्हाला साथ राहील.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT