Maharashtra Congress : काँग्रेसमध्ये चाललंय काय? युवक प्रदेश सचिवाचे निलंबन अवघ्या 24 तासांत मागे...

Mangesh Chavan News : मंगेश चव्हाण हे प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव होते. पक्ष कार्यात सक्रिय नसणे, प्रदेश युवकच्या बैठकांना हजर नसणे, पक्ष कार्यक्रम न राबविण्याचा ठपका ठेवत त्यांना पदावरून निलंबित केले होते, तसे पत्र युवक कॉंग्रेसचे प्रभारी उदय भानू यांनी काढले होते.
Mangesh Chavan
Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मंगेश चव्हाण यांचे निलंबन पक्षाने अवघ्या 24 तासांत मागे घेतले आहे. हा घडलेला प्रकार अनवधानाने झाला असल्याची कबुली युवकचे प्रदेश सचिव जयदीप थोरात यांनी दिली. चव्हाण हे युवकांचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाने काँग्रेसमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या वादावर तूर्त पडदा पडल्याचे स्पष्ट झाले.

मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) हे प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव होते. पक्ष कार्यात सक्रिय नसणे, प्रदेश युवकच्या बैठकांना हजर नसणे, पक्ष कार्यक्रम न राबविण्याचा ठपका ठेवत त्यांना पदावरून निलंबित केले होते. तसे पत्र युवक कॉंग्रेसचे (Youth Congress) प्रभारी उदय भानू यांनी काढले होते.

Mangesh Chavan
Rohit Patil : रोहित पाटील यांचा सुरेश खाडे यांच्यावर निशाणा; पाण्याचे राजकारण थांबवा अन्यथा...

वास्तविक मंगेश चव्हाण यांना प्रदेशवरून कधीच बैठकीचे निरोप आले नव्हते, असा दावा चव्हाण यांचा आहे. तरीही त्यांच्यावर चुकीचे आरोप करून निलंबित केले होते. यावरून कॉंग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण झाला होता, त्यामुळे मंगेश चव्हाण यांचे निलंबन अवघ्या 24 तासांत मागे घेण्यात आले.

युवकचे प्रदेश सचिव थोरात म्हणाले, चव्हाण यांचे निलंबन अनवधानाने झालेले आहे. वास्तविक चव्हाण 13 वर्षे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉंग्रेसचे काम सक्षमपणे केले आहे. त्यांची दखल प्रदेश कॉंग्रेस, ऑल इंडिया कॉंग्रेस व राहुल गांधी यांनी घेतली होती. त्यांचे निलंबन अनवधानाने झाले असून, त्यांना पुन्हा प्रदेश सचिवपदावर काम करण्याची संधी दिली आहे. तसे पत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Mangesh Chavan
Devendra Fadnavis News : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याला देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले ?

भविष्यात त्यांच्यावर जिल्ह्यात युवक कॉंग्रेस वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. शिवाय बूथ कमिट्या, ‘रोजगार दो, न्याय दो’ या अभियानाचे काम करण्याबाबतच्या सूचना प्रदेश काँग्रेसने दिल्या असल्याचे थोरात यांनी सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश सचिव चव्हाण यांना हटविण्यात आल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये वादाला पुन्हा तोंड फुटले होते. अनवधानाने झालेली चूक सुधारत वादावर पडदा टाकण्यात आला. त्यामुळे प्रदेश सचिव चव्हाण हे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सक्रिय होणार आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

Mangesh Chavan
Shirur Loksabha Constituency : अजितदादांचा ‘दुसरा हट्ट’ही वळसे पाटील पूर्ण करणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com