Gopichand Padalkar Sarkarnama
पुणे

Gopichand Padalkar : मोठी बातमी! पडळकरांवर चप्पलफेक, ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर वातावरण पेटलं

Indapur OBC Elgar Sabha : पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मराठा आंदोलकांकडून मागणी...

Deepak Kulkarni

Indapur News: पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ओबीसी समाजाची एल्गार सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली आहे.

ही सभा आटोपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सभेनंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या चप्पलफेकीनंतर ओबीसी समाजही आक्रमक झाला असून पुणे- सोलापूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी इंदापुरात चप्पलफेक करण्यात आली आहे. ही चप्पलफेक पडळकरांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. (Maratha Protest)

तर स्थानिक मराठा आंदोलकांनी हा आरोप फेटाळून लावत आम्ही फक्त त्यांना उपोषणस्थळी येण्यापासून रोखलं होतं असं म्हटलं आहे. तसेच त्यांच्याच कार्यकर्त्यांचं हे कृत्य असल्याचेही या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसी एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मराठा समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तसेच पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं...?

इंदापुरातील ओबीसी(Obc) समाजाचा एल्गार मेळाव्या संपल्यानंतर धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे मराठा समाजाच्या साखळी उपोषण स्थळाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ओबीसी एल्गार मेळावा ज्या ठिकाणी होता, त्यापासून अगदी काही अंतरावर असलेल्या मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्या उपोषणस्थळी पडळकर येणार होते, पण त्यांना आंदोलकांनी मज्जाव केला. तरीदेखील ते उपोषणस्थळी येण्यावर ठाम होते. याचमुळे वातावरण तापल्याचं बोललं जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT