Indapur Obc Melava : मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, काकडे, जाचक कुणबीचे प्रमाणपत्र घेणार का? भुजबळांचा सवाल

chhagan Bhujbal News : नको असेल तर नाही म्हणून सांगा. पण, हे नेते गप्प का बसले आहेत?
Vijaysinh Mohite Patil-Harshvardhan Patil-chhagan Bhujbal
Vijaysinh Mohite Patil-Harshvardhan Patil-chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतात. मग इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, अकलूजचे विजयसिंह मोहिते, काकडे, जाचक हे कुणबीचे प्रमाणपत्र घेणार का? नको असेल तर नाही म्हणून सांगा. पण, हे नेते गप्प का बसले आहेत, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला. (Mohite Patil, Harshvardhan Patil, Kakade, Jachak Will take Kunbi certificate? : Bhujbal)

इंदापूरमध्ये ओबीसी मेळावा सुरू आहे. त्यात बोलताना छगन भुजबळ यांना मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील या बड्या नेत्यांना कुणबी प्रमाणपत्र घेणार का, असा सवाल केला. तसेच, जरांगे म्हणतात की, राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, म्हणजे राज्यात एकही मराठा उरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijaysinh Mohite Patil-Harshvardhan Patil-chhagan Bhujbal
Solapur DCC Bank : सोलापूर देखरेख संघाची 52 वर्षांनंतर प्रथमच निवडणूक; ‘डीसीसी’मधील ताकदीचा येणार अंदाज

छगन भुजबळ म्हणाले की, बीडमध्ये आमदारांची घरे पेटवली. आपल्याच स्वकीयांवर हल्ले करा. बायका-मुलांवर हल्ले करा, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे का? मोठंमोठे नेतेही त्यावर बोलायला तयार नाहीत. कसली भीती वाटते. निवडणुकीतील मतांची. मतं त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे नाहीत का? त्यांच्याकडे २० टक्के आहेत, तर आमच्याकडेही ८० टक्के मते आहेत.

मी बोललो की महाराष्ट्रात अशांतता निर्माण केली जात आहे, असे काही विचारवंत म्हणतात. पण, राज्यात शांतता असेल तर उद्योगधंदे येतील. तरुणांच्या हाताला काम मिळेल. राज्याची आर्थिक सुबत्ता वाढेल, हे सर्व मान्य आहे. पण अशांतता कोण निर्माण करतं, याचा विचारही सर्व विचारवंतांनी करण्याची गरज आहे. आम्हालाही सर्व काही ऐकून घेण्याची सवय नाही. त्यामुळे ‘आमचेही सौ सोनार की एक लोहार की’ असे असते, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

Vijaysinh Mohite Patil-Harshvardhan Patil-chhagan Bhujbal
Sangamner News : विखेंचा 'ठराव', थोरातांचा 'पाठपुरावा' आणि तांबेंच्या 'निवेदना'वरुन राजकारण तापणार ?

भुजबळ म्हणाले की, लाठीहल्ला आणि पोलिसांवर झालेला हल्ला याचा उल्लेख पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. महिला पोलिसांवर हात टाकण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात लेखी उत्तर दिलं. जमाव हिंसक झाला. त्यात ७९ पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ५० आंदोलक जखमी झाले. हे खरं शेवटी विधानसभेतून बाहेर आले.

Vijaysinh Mohite Patil-Harshvardhan Patil-chhagan Bhujbal
Congress Election Strategy : कर्नाटक, तेलंगणातील यशानंतर काँग्रेस दक्षिण भारतासाठी घेणार मोठा निर्णय! खुद्द सोनिया गांधी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com