Pune Hit And Run Case Sarkarnama
पुणे

Pune Hit And Run Case : पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट: चालकाला डांबून ठेवल्याने विशाल अगरवालला पोलीस कोठडी

Sachin Waghmare

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली.यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकारण तापलं असून पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपी विशाल अगरवाल (Vishal Agrwal) दोन दिवसापूर्वी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विशाल अगरवालची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात येणार आहे. पुणे न्यायालयाने पोलीस कोठडी (Police Custody) दिली. सोमवारीच येरवडा जेलमधून विशाल अगरवालला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते.

हिट अँड रन (Pune Hit And Run Case ) प्रकरणात चालकाला डांबून ठेवण्या प्रकरणी पुन्हा अटक करण्यात आली आहे.याच गुन्ह्यात विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र अग्रवाल याला आधीच अटक करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरण गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर तपासाची संपूर्ण दिशा बदलून वेग येणार असल्याची चर्चा आहे. आरोपीचे वडील आणि आजोबा यांची एकत्रित चौकशी करण्याची शक्यता आहे. यावर चर्चा करण्यासाठीच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती आहे.

कल्याणीनगर येथील झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर स्थानिक आमदाराने दबाव आणल्याचा आरोप झाला. तसेच आरोपीस गंभीर गुन्हा करूनही काही तासांतच जामीन मिळाल्याने पोलिसांच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी कडक पावले उचलून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तसेच या अपघाताच तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला.

SCROLL FOR NEXT