Pune News, 27 May : कल्याणीनगरात दोघांना चिरडून बाल सुधारगृहात मुक्काम हलविलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये बदल केल्यानं ससून रूग्णालतील डॉ. अजय तावरे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
अल्पवयीन मुलगा, वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यापाठोपाठ प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्याचेही हात असल्याचं उघड झाल्यानं याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
तरीही विशाल अगरवाल यानेच डॉ. तावरेंना फोन करून रिपोर्ट बदलण्यास सांगितलं होते. मात्र, अगरवाल याच्या फोननंतर डॉ. तावरेंना अन्य कुणी म्हणजे राजकीय नेत्यांनी तावरेंना कुणी फोनाफोनी केली का? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
गंभीर म्हणजे या घटनेत चर्चेत आलेले आमदार की राज्य पातळीवरील अन्य कुणी नेत्यानं डॉ. तावरेंना ब्लड रिपोर्ट बदलण्यास भाग पाडले का? याकडे दाट संशयानं पाहिलं जात आहे. मुळात तावरे स्वत:हून रिपोर्टमध्ये बदल करणार नाहीत, हेही स्पष्ट आहे. त्यामुळेच याप्रकरणात कोणा बड्या नेत्यानं हस्तक्षेप केला, याची चर्चा पुणेकर आणि पर्यायाने राज्यात होऊ लागली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ) याने डॉ. तावरेंना प्रत्यक्ष फोन केल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. "विशाल अगरवाल यांचे डॉ. तावरे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क असल्याची बाबी तांत्रिक स्वरूपातून समोर आलं आहे," असं अमितेश कुमार यांनी म्हटलं.
"अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये अल्कहोल आढळून आले नाही. कारण, ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्यानं अल्कहोल आढळून येणार नाही," असं अमितेश कुमार ( Amitesh Kumar ) यांनी सांगितलं.
दरम्यान, अल्पवयीन मुलगा कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचं समोर आलं आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हलणोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टची अदलाबदल केल्याचा आरोप आहे.
अल्पवयीन मुलानं मद्यप्रशासन केले होते की नाही हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रूग्णालयात ब्लड टेस्ट केली होती. मात्र, ससून रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.