Pune Municipal Election: CM Meeting 50% Seat Sharing: Sarkarnama
पुणे

Pune Standing Committee: पुण्यात गणेश बिडकरांनंतर आणखी एका नेत्याचे पुनर्वसन फिक्स : थेट तिजोरीच्या चाव्याच देणार हाती?

Pune Municipal Corporation News : या पदासाठी पुणे महानगरपालिकेतील 24 जणांच्या नावाची यादी भाजपच्या हायकंमाडकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 12 नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यामध्ये जुन्या-नव्या सदस्यांना संधी देण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : पुणे स्थायी समिती सदस्यपदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहयवयास मिळत होती. या पदासाठी पुणे महानगरपालिकेतील 24 जणांच्या नावाची यादी भाजपच्या हायकंमाडकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 12 नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यामध्ये जुन्या-नव्या सदस्यांना संधी देण्यात आली आहे. यामधुन आता स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. पुण्यात गणेश बिडकरांनंतर आणखी एका नेत्याचे पुनर्वसन फिक्स झाले असून थेट तिजोरीच्या चाव्याच या नेत्याच्या हाती देण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

स्थायी समितीचे सदस्यांमध्ये रूपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भुमकर, विशाल धनवडे, रत्नमाला सातव, प्राची आल्हाट, मयुरी कोकाटे, निशा मानवतकर, श्रीनाथ भिमाले, दादा कोद्रे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता भाजपची (BJP) ही यादी पाहता स्थायी समितीचे अध्यक्षपद हे श्रीनाथ भिमाले यांच्याकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) स्थायी समितीसाठी अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे यांना संधी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून माजी महापौर प्रशांत जगताप यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे सर्वांचे आता त्याकडे लक्ष लागले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या एकूण 16 सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ पाहता त्यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यात पक्षाने जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे आता येत्या काळात स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस असणार आहे.

भाजपने स्थायी समितीच्या सदस्यांची निवड केली आहे. त्यामुळे आता खरा संघर्ष अध्यक्षपदासाठी आहे. हे पद केवळ मानाचे नसून आर्थिक सत्तेचे केंद्र असल्याने भाजपमधील अनेक दिग्गज नेते या पदासाठी फिल्डिंग लावून आहेत. मात्र, एकंदरीतच ही १२ जणांच्या नावाची यादी पाहिली तर या पदासाठी श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यांची या पदावर वर्णी लागू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT