Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

Maharashtra former minister arrest warrant news : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Ranjeet Deshmukh
Ranjeet DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. धनादेश वाटण्या संबंधित ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

आर्थिक व्यवहारा संबंधित प्रकरणात वारंवार न्यायालयात उपस्थित राहिल्यामुळे देशमुख यांच्यासह आणखी दोघांविरूद्ध ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात याचिकाकर्ते अतुल देवगडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. असा आरोप केला आहे की, त्यांना 11 लाख रुपयांच्या एकूण 5 धनादेश देण्यात आले होते. मात्र त्यापैकी एकाही धनादेशाची रक्कम खात्यात जमा झाली नाही.

Ranjeet Deshmukh
BMC News : मुंबईत अखेर सत्तेचे 'डील' फायनल? महायुतीचा 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला? मंगळवारपूर्वी लागणार मोठा निकाल!

तक्रारीनुसार, परसेप्ट वेब सोल्यूशन प्रा. लिमिटेड या कंपनीकडून संगणक, इंटरनेट आणि वेबसंबंधित साहित्य खरेदी करण्यात आले होते. या कंपनीच्या संचालकांमध्ये रणजित देशमुख, पल्लवी पारेख आणि अमित धुपे यांचा समावेश आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कंपनीने 11,50,000 रुपयांचे 5 धनादेश दिल्याचे सांगितले जाते. मात्र बँकेत सादर केल्यानंतर हे सर्व धनादेश अनादरित झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.

या प्रकरणात वारंवार संपर्क साधून तसेच कायदेशीर नोटीस पाठवून रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर संबंधित तिघांनी जामीन मिळवला होता. न्यायालयीन प्रक्रियेत वारंवार गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने कठोर भूमिका घेत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशमुख यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षातील त्यांच्या स्थानामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

Ranjeet Deshmukh
Maharashtra Politics : 5 नेत्यांना आमदारकीची 'लॉटरी' लागणार : झेडपी-मनपा गाजवणाऱ्यांची नावे आघाडीवर; कोणाचं नशीब उघडणार?

दरम्यान, या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी या प्रकरणावरून टीकेची झोड उठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर समर्थकांकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संबंधितांनी अद्याप या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com