Pune News : आम आदमी पार्टीची भाजपला धास्ती लागली असून, त्यांनी अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सीबीआय किंवा ईडीमार्फत अटक करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप 'आप'च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. इंडिया आघाडीमध्ये आप व काँग्रेसमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'आप'च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ करण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपला आव्हान मिळणार आहे. त्यामुळे भाजपकडून अरविंद केजरीवाल यांना सीबीआय किंवा ईडीमार्फत अटक करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे.
आपचे राज्याचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सतीश यादव, अक्षय शिंदे, किरण कद्रे, निरंजन अडागळे व अमोल काळे या वेळी उपस्थित होते. किर्दत म्हणाले, आप व काँग्रेस यांची आघाडी होणार नाही, अशी समजूत करून घेत भाजपने केजरीवाल यांना यापूर्वी ईडीमार्फत नोटीस बजावत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता आप व काँग्रेस यांच्यासह इंडिया आघाडीत जागावाटप झाल्याची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच बहुतांश राज्यात इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची अधिकृत घोषणाही केली जाणार आहे, ही बाब भाजपच्या लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांनी आता अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्याकडून अटकेची कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
आपच्या राज्य व देश पातळीवरील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. हे लोकशाही विरोधी आहे. त्याविरुद्ध इंडिया आघाडी एकत्रितपणे लढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.