Medha kulkarni Sarkarnama
पुणे

Medha kulkarni : मेधा कुलकर्णींची कोथरुडनंतर आता पाषाणमध्ये धाड; नेमकं काय झालं...

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींनी आता पुन्हा मोठं ‘डेअरिंग’ केलंय… म्हणजे काय, मेधाताईंनी स्वपक्ष किंवा विरोधी नेत्यांवर काही ‘बोल्ड स्टेटमेंट’ देऊन राजकीय गदारोळ उडवून दिलाय की काय, असं काहीसं वाटेल. पण तसं काहीही झालेलं नाही ! मेधाताईंनी थेट पाषाणमधील एका मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकलीय. सर्व पुरावे जमा करून पोलिसांना पाचारण केलं. त्यांच्या या धाडसाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.

मेधा कुलकर्णींनी याआधी चार वर्षांपूर्वी कोथरुडमधील लक्ष्मीनगरचा दारूअड्डा, तोही हातभट्टीचा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर त्यांनी आज पाषाणमधला मटक्याचा अड्डा गाठला. तेथील चिठ्ठ्यांवरचे थेट आकडे म्हणजे, नोंदीच तपासल्या. मेधाताई असं कुठच्या मटक्याच्या अड्ड्यावर गेल्या, तिथले पेपर (मटक्याच्या आकड्याच्या नोंदी असलेले) तपासले. त्याचं शूटिंगही केलं अन् त्यानंतर पोलिसांनाही बोलावलं. थोडक्यात काय; तर मेधाताईंनी मटक्याचा अड्डा बंद पाडला.

याआधी कोथरुडच्या आमदार असताना मेधाताईंनी कोथरुडमधल्या दारूअड्ड्यावर जाऊन तो बंद पाडला. तेव्हा, त्यांची मोठी चर्चा झाली होती. आता आमदारपद असलं काय अन् नसलं काय, मेधाताई दारू, मटक्याच्या अड्ड्यांना काही सुटी देताना दिसत नाहीत. आपल्या स्टाईलमध्ये जात त्यांनी पाषाणमधल्या मटक्याचा अड्डा बंद केला. हे करताना त्यांनी पोलिसांचीही मदत घेतली. (Latest Political News)

पाषाणमधल्या बालाजीनगरात मटक्याचा अड्डा असल्याचं मेधाताईंच्या (Medha Kulkarni) कार्यकर्त्यांनी त्यांच्या कानावर घातलं होतं. मग, अशा कामात मागे न राहणाऱ्या मेधाताईंनी ‘प्लॅन’ आखला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्यांनी मटक्याच्या अड्ड्यावर धडक मारली, तेही एकाकीच. मेधाताईंच्या अचानक झालेल्या 'एन्ट्री'नं मालकांसह तिथले लोकही जाम घाबरले. त्यांच्या आवाजानं, प्रश्नानं तेथील वातावरण तंग झालं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'काय चालले आहे, हा (अड्डा) कोणाचा आहे ? हे काय चालले आहे….?' अशा दमदार आवाजात धडकी भरवणाऱ्या प्रश्‍नांवर अड्डामालकांवर सरबत्ती केली. या गोंधळात पळ काढणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यानंतर गर्दीला हुसकावून लावलं. पण मालकाला अर्थात, तिथल्या मॅनेजरला काही मेधाताईंना हलू दिलं नाही. त्याच्याकडील पेपर, त्यावरच्या नोंदीही त्यांनी बारकाईने पाहिल्या. हे सगळ झालं... आणि लगोलग पोलिस इन्स्पेक्टरला बोलावलं. आधी दारूअड्डा बंद पाडणाऱ्या मेधाताई आता मटक्याचा अड्डा बंद पाडून चर्चेत आल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT