Bramati By Election Sarkarnama
पुणे

Bramati By Election : बारामती पोटनिवडणुकीचे बिनविरोधच्या दिशेने एक पाऊल : भाजपचा पुढाकार, स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांची भूमिका पुढे नेणार...

BJP News : बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वय साधत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू करण्यात येणार आहे.

मिलिंद संगई

Baramati, 16 March : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वय साधून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून विनंती केली जाणार आहे, त्यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडल्याचे मानले जात आहे.

बारामती (Baramati) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या पोटनिवडणुका सर्व पक्षांशी समन्वय साधून बिनविरोध व्हाव्यात’, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली होती.

पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, या मुख्यमंत्र्यांंच्या भूमिकेचे बारामती तालुका भारतीय जनता पक्षाच्या (Baramati BJP) वतीने स्वागत करण्यात आले आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे स्थानिक नेते दिलीप खैरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सरचिटणीस राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वासोबत समन्वय साधून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक दृष्टिकोनातून योग्य ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतात. अजित पवार यांच्यासारखं नेतृत्व आकस्मिक गेल्यामुळे निर्माण झालेल्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वपक्षीय बारामतीकरांची भूमिका राहील, अशी अपेक्षाही खैरे यांनी व्यक्त केली.

ही निवडणूक बिनविरोध होणे हीच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. बारामती तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विनंती करण्यात येणार आहे, असे बारामती भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT