Maan Sabhapati Election : गोरेंना मतदारसंघातच मोठा धक्का; माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा, सभापती, उपसभापतिपदी बाजी

Jaykumar Gore Setback In Maan : माण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सभापतिपदी विक्रम शिंगाडे आणि उपसभापतिपदी प्रियांका जगदाळे यांची ईश्वरी चिठ्ठीवर निवड झाली, त्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांना धक्का बसला.
Maan Panchayat Samiti sabhapati election
Maan Panchayat Samiti sabhapati electionSarkarnama
Published on
Updated on

Satara, 16 March : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना होम ग्राउंडमध्ये असलेल्या माण पंचायत समितीत मोठा धक्का बसला आहे. मंत्री गोरे यांच्या मतदारसंघातील माण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सभापतिपदी विक्रम शिंगाडे यांची, तर उपसभापतिपदी प्रियांका जगदाळे यांची ईश्वरी चिठ्ठीवर निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांना आपल्याच मतदारसंघातील पंचायत समिती गमावावी लागली.

माण पंचायत समितीच्या (Maan Panchayat Samiti) सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम शिंगाडे यांना, तर भारतीय जनता पक्षाकडून अर्जून काळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे ईश्वरी चिठ्ठीवर निर्णय होता.

निवड प्रक्रियेवेळी शिंगाडे आणि काळे यांना प्रत्येकी पाच मते मिळाली. त्यामुळे ईश्वरी चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिंगाडे यांच्या बाजूने चिठ्ठीचा कौल आला आणि माण पंचायत समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला.

उपसभातिपदासाठी राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे आणि भाजपचे डॉ. राजेंद्र खाडे यांच्यातही काँटे की टक्कर झाली. जगदाळे आणि खाडे यांनाही प्रत्येकी पाच मते पडली, त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीच्या आधारे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे यांची निवड झाली. त्यामुळे भाजपला दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला.

Maan Panchayat Samiti sabhapati election
Shahajibapu : 50 वर्षांची सत्ता जाताच शहाजीबापूंनी डागली शेकापवर तोफ; ‘त्यावेळी दुसरीकडं तोंड करायचो, एवढा भारी कारभार..’

पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरेंनी सोलापूर जिल्ह्यात अकरापैकी दहा पंचायत समितीत भाजपची सत्ता आणली होती, त्या पार्श्वभूमीवर घरच्या मैदानात मात्र त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागले आहे. माण पंचायत समितीत त्यांना सभापती आणि उपसभापतिपदही गमावावे लागले आहे

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीचे पाच गण जिंकत बाजी मारली हेाती. भारतीय जनता पक्षालाही पंचायत समितीत पाच जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे पंचायत समितीवर कोणाची सत्ता येणार, याची प्रचंड उत्सुकता माणमध्ये होती.

Maan Panchayat Samiti sabhapati election
Sangli Politics: सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महायुतीतल्या आणखी एका घटक पक्षाचे सदस्य फुटले

पंचायत समितीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच सदस्य हे अज्ञातस्थळी गेले होते. ते आज सकाळीच मतदान स्थळी दाखल झाले आणि थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यात दोन मंत्री, खासदार, आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविलेले हे यश उल्लेखनीय मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com