Khatav Sabhapati : खटावमध्ये जयकुमार गोरेंची खेळी ; सभापतिपद माणकडे, उपसभापतिपद दिले शिंदेसेना आमदाराच्या मतदासंघात

Panchayat Samiti sabhapati-Ubsapati Election : खटाव पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या वनिता दुबळे बिनविरोध निवडल्या गेल्या. उपसभापतिपदी रेश्मा शेडगे यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम कदम यांचा दोन मतांनी पराभव करून भाजपचे वर्चस्व कायम ठेवले.
Mahesh shinde-Jaykumar Gore
Mahesh shinde-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Vaduj, 16 March : खटाव पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वनिता दुबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापतिपद हे अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते, त्यानुसार एकमेव निवडून आलेल्या दुबळे या बिनविरोध सभापती झाल्या आहेत.

उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रेश्मा शेडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम कदम यांचा दोन मतांनी पराभव करत बाजी मारली आहे. खटाव पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी उपसभापतिपद हे शिवसेनेचे आमदार असलेल्या खटाव-कोरेगाव मतदारसंघात दिले आहे.

खटाव पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १४ पैकी ८ जागा पटकावून पंचायत समितीवर वर्चस्व मिळविले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. भाजपकडून वनिता दुबळे, शशिकांत रोमण, हणमंतराव बोटे, प्रसाद जुगदर, डॉ. प्रगती कोकाटे, वैशाली मोरे, रेश्मा शेडगे, अनिता कोळी हे आठ सदस्य निवडून आले होते. मनोज देशमुख, संग्राम कदम-पाटील, शुभम शिंदे, महेश वाघ, श्यामली साळुंखे, स्नेहल जाधव हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते.

सभापतिपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते, त्यामुळे भाजपच्या कातरखटाव गणाच्या सदस्या वनिता दुबळे या प्रवर्गाच्या एकमेव सदस्या विजयी झाल्या होत्या, त्यामुळे अपेक्षेनुसार सभापतिपदी दुबळे यांची निवड झाली आहे. दुबळे यांच्या माध्यमातून सभापतिपद हे गोरे यांचा मतदारसंघ असलेला खटाव-माणकडे गेले हेाते, त्यामुळे उपसभातिपदाबाबत उत्सुकता होती.

Mahesh shinde-Jaykumar Gore
Maan Sabhapati Election : गोरेंना मतदारसंघातच मोठा धक्का; माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा, सभापती, उपसभापतिपदी बाजी

खटाव-माण, खटाव-उत्तर कऱ्हाड आणि खटाव-कोरेगाव हे तीन विधानसभा मतदारसंघ खटाव पंचायत समितीशी निगडित आहेत, त्यामुळे कोणत्या विधानसभा मतदार संघातील व कोणत्या नेत्याच्या कार्यकर्त्याला संधी दिली जाणार याबाबत उत्सुकता होती.

उपसभापतिपद हे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातून येणाऱ्या रेश्मा शेडगे यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार उपसभापतिपदासाठी भाजपकडून निवडून आलेल्या रेश्मा शेडगे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. निवडणुकीत संख्याबळानुसार शेडगे यांना आठ, तर कदम यांना सहा मते मिळाली, त्यामुळे शेडगे यांनी उपसभातिपदी वर्णी लागली.

Mahesh shinde-Jaykumar Gore
Latur ZP president : लातूर ZP अध्यक्षपदाच्या रेसमध्ये संभाजी पाटील निलंगेकरांची बाजी : उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटलांच्या समर्थकाला लॉटरी

सभापतिपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने उपसभापतिपदासाठी भाजपतील सदस्यांमध्ये मोठी चुरस होती. मात्र, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आपापसांत चर्चा करून उपसभापतिपद हे शेडगे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com