Pune BJP Sarkarnama
पुणे

Pune BJP: भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर; महिला पदाधिकाऱ्यांवर सोपवल्या नव्या जबाबदाऱ्या

Political News: पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका राजकीय पक्षांनी लावला आहे.

Ganesh Thombare

Pune News: आगामी लोकसभा, विधानभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षातील नेते मतदारसंघात जाऊन बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीही जोरदार कंबर कसली आहे. राज्यात पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका राजकीय पक्षांनी लावला आहे.

या अनुषंगानेच भाजपने देखील पक्ष संघटनेवर विशेष लक्ष केंद्रित केले असून पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. आता पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेविकांसह नव्या व जुन्या महिला कार्यकर्त्यांवर नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये ९ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, ९ चिटणीस ५ कार्यकारिणी सदस्य यासह इतर पदांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी हर्षाली माथवड, अश्‍विनी पांडे, स्वाती लोखंडे, सरस्वती अडागळे, विजया भोसले, थोरविना येनपुरे, वंदना कोद्रे, जान्हवी देशपांडे, कविता मुडविकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच सरचिटणीसपदी आरती कोंढरे, स्वाती मोहोळ, श्यामा जाधव, उज्वला गौड, गायत्री खडके, प्रियांका शिंदे, भावना शेळके, कोमल कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी वीणा सातपुते, स्वाती कुरणे, सुवर्णा काकडे, खुशी लाटे, सीमा शेंडे, मदिना तांबोळी, सुषमा तांबे, मनीषा जाधव, तेजश्री पुरंदरे यांची नियुक्ती करण्यात आली.

बचतगट प्रकोष्ठ संयोजकपदी सुषमा कांबळे, तर बॅंकिंग अँड फायनान्स प्रकोष्ठ संयोजकपदी भाग्यश्री बोरकर, योजना प्रकोष्ठ संयोजकपदी सीमा जगताप, अनुसूचित जाती जमाती प्रकोष्ठ संयोजकपदी आरती साठे, कार्यकारिणी सदस्यपदी सारिका देशमुख, तृप्ती विसपुते, कल्पना अय्यर, मीरा फडणीस, शोभा पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT