Gram Panchayat Results : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारच ‘दादा’; इंदापूरसह चार तालुक्यांतील ६४ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर झेंडा

Pune Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादीपाठोपाठ ११ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत.
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results Sarkarnama

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने बारामती मतदारसंघात सर्वाधिक जागा जिंकत पुणे जिल्ह्यात आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले आहे. बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांतील ६४ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर अजितदादा गटाने आपला झेंडा फडकवला आहे. (Gram Panchayat Election Results : Ajit Pawar group's victory in 64 Gram Panchayats of Baramati Lok Sabha Constituency)

बारामती मतदारसंघात येणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील ६४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. ५ नोव्हेंबर) मतदान झाले. सोमवारी (ता. ६ नोव्हेंबर) झालेल्या मतमोजणीत या चार तालुक्यांपैकी दौंड वगळता इतर तीन ठिकाणी अजित पवार गटाने बाजी मारल्याचे दिसून येते. या चार तालुक्यांतील ६४ पैकी सर्वाधिक ४२ ग्रामपंचायती अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ ११ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : हर्षवर्धन पाटलांनी गड राखला; राष्ट्रवादीचे डाव उलथवत बावड्याची सत्ता राखली

अजित पवार आणि चाळीस आमदारांनी भाजप-शिवसेनेसोबत जाऊन सरकारमध्ये सामील होणे पसंत केले. त्या बंडानंतर अजित पवार गटाला आपली भूमिका पटवून देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचे मोठे व्यासपीठ मिळाले, त्यात त्यांनी आपली भूमिका जनतेला पटवून देत या चार तालुक्यांत सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, त्यामुळे अजित पवार गटाच्या भूमिकेला जनतेने आशीर्वाद दिल्याची भावना त्यांच्या गोटातून व्यक्त होत आहे.

बारामतीतील ३२ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायती अजित पवार गटाने जिंकल्या आहेत. भाजपला दोन ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. शरद पवार गटाने निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस या पक्षांना आपले खातेही उघडता आले नव्हते. बारामतीत अजित पवार गटाने एकहाती सत्ता राखली आहे.

दौंड तालुक्यात मात्र अकरा ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आठ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळविले आहे. अजित पवार गटाला दौंडमध्ये केवळ एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. अपक्षांनी दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता हस्तगत केली आहे. माजी आमदार रमेश थोरात यांना विधानसभा निवडणुकीनंतर चमक दाखवता आली नाही. ती ग्रामपंचायत निवडणुकीत कायम राखली आहे.

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती अजित पवार गटाने एकहाती जिंकल्या आहेत. पुरंदरमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती होती. मात्र, भाजपशी युती करूनही माजी मंत्री विजय शिवतारे यांना चार ग्रामपंचायतींच्या पुढे विजय मिळविता आलेला नाही. भाजप आणि शिंदे गटाने मिळून चार ग्रामपंचायतीत बाजी मारली आहे. काँग्रेसने तीन ठिकाणी, तर एका ठिकाणी अपक्षांनी विजय हस्तगत केला आहे.

इंदापूर तालुक्यातील ६ पैकी सहा ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यात अजित पवार गटाने चार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. शिंदे गटाला या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही. भाजपने एक ग्रामपंचायत जिंकली आहे. इतरांनी एका ग्रामपंचायतीत यश मिळविले आहे.

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : सहकारमंत्र्यांना मोठा धक्का; वळसे पाटलांच्या गावात शिंदे गटाचा सरपंच विजयी

दरम्यान, भोरमध्ये १३, वेल्ह्यात सहा, तर मुळशीत २३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मात्र, या तीन तालुक्यांत सर्वच पक्षांनी आपण सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. त्यातही अजित पवार गटाकडून सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा करण्यात येत आहे.

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Result : सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटलांना धक्का; तीन ग्रामपंचायतींमध्ये पराभव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com