Chhagan-Bhujbal  Sarkarnama
पुणे

helicopter incident clarification: 'त्या' प्रत्येकावर सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री नजर ठेवून; खरात प्रकरणात भुजबळांची महत्त्वाची माहिती

Phule Wada visit News : हेलिकॉप्टर सुरक्षित खाली उतरले आणि आम्ही सुरक्षित बाहेर आलो. काळजी करण्याचे कारण नाही. फक्त हेलिपॅड न दिसल्यामुळे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरले.

Sudesh Mitkar

Pune News : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी आपल्या हेलिकॉप्टरच्या कार पार्किंगमध्ये उतरण्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. त्यासोबतच भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर देखील भाष्य केले.

पुण्यातील पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, 'हेलिकॉप्टरचा उतरताना अपघात वगैरे काही झाला नाही. हेलिकॉप्टर सुरक्षित खाली उतरले आणि आम्ही सुरक्षित बाहेर आलो. काळजी करण्याचे कारण नाही. फक्त हेलिपॅड न दिसल्यामुळे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरले.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या जीवाला धोका असल्याबाबतचे पत्र एसआयटीला देण्यात आले आहे. त्याबाबत बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, 'सुनेत्रा वहिनीसोबत आम्ही सगळे आहोत. त्यांना काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकार देखील त्यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवत आहे.'

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आपल्या लोकांना सांगतो की अंधश्रद्धेपासून दूर राहा, म्हणजे असे बाबा निर्माण होणार नाहीत. लोकांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आचरणात आणले तर ते अशा भानगडीत पडणार नाहीत.'

भुजबळ पुढे म्हणाले तसेच भोंदूबाबा खरात प्रकरणांमध्ये ज्यांची ज्यांची नावे आली आहेत. त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. जे खरात याच्या दुष्कृत्यांमध्ये सामील आहेत, त्यांच्यावर गेल्या सहा महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वॉच आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. मात्र, या सर्व प्रकरणामुळे नाशिक जिल्हा बदनाम होत आहे.'

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत भुजबळ म्हणाले, “जी महिला त्या पदाला योग्य आहे आणि न्याय देणारी आहे, त्या महिलेला पद द्यावे, अशी आमची भूमिका आहे. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “कुणीही झाडे न तोडता सगळी कामे करावीत, अशा मताचा मी आहे. नवीन पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय वृक्षतोड करू नये.” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT