Chhagan Bhujbal : अजितदादा 15 वर्षे काँग्रेससोबत सरकारमध्ये होते, भुजबळ थेटच बोलले... पार्थ पवारांची घेतील बाजू

Chhagan Bhujbal On Congress : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवत आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची इच्छा होती. मात्र कॉंग्रेसने सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे.
Chhagan Bhujbal, Parth Pawar
Chhagan Bhujbal, Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati by election news : सध्या राज्याच्या राजकारणात बारामतीची पोटनिवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती करूनही काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.

या मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार देणे म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे पार्थ पवार यांनी म्हटले. त्यानंतर आता कॉंग्रेसने पार्थ पवार यांना घेरत त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरु केला आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? अशा शब्दात कॉंग्रेसने पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे.

Chhagan Bhujbal, Parth Pawar
Baramati Bypoll : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणाऱ्या काँग्रेसमध्येच वाद

दरम्यान, यावर मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांची बाजू घेत कॉंग्रेसला सुनावले आहे. भुजबळ म्हणाले, अजित पवार हे 15 वर्षे काँग्रेससोबत सरकारमध्ये होते. अजितदादांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या सर्व कॉंग्रेस नेत्यांसोबत काम केलं. मात्र, असे असूनही काँग्रेसने जे केलं त्यामुळे पार्थ पवारांचा हा त्रागा झाला असावा. अशी दुर्घटना घडलेली असताना सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देताना काँग्रेसने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा होता, असे भुजबळ म्हणाले.

तसेच बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी राष्ट्रवादीचा मेळावा झाला त्या फलकावर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र माझा फोटो लावणे चुकीचे आहे असे शरद पवारांनी म्हटले होते, त्यासंदर्भात विचारले असता भुजबळ म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी आधीच पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्याप्रती उपकृत भावना म्हणून फोटो लावला.

रोहित पवार, युगेंद्र पवार रोज अजितदादांचे फोटो वापरतात. मग त्याचं काय करायचं? असा सवाल भुजबळांनी उपस्थितीत केला. याशिवाय मी आणि वळसे पाटील स्वत: सिल्व्हर ओकवर जाऊन साहेबांना भेटून अर्ज दाखल करतोय असे सांगितल्याचे भुजबळांनी नमूद केले.

Chhagan Bhujbal, Parth Pawar
Nagpur RSS Headquarters: नागपूरमधून धक्कादायक अपडेट समोर,'RSS'च्या कार्यालयाजवळ स्फोटकं आढळली; पोलिसांचा तडकाफडकी मोठा निर्णय

दरम्यान, कॉंग्रेसची मनधरणी करण्यात तुम्ही कमी पडला का? असा सवाल पत्रकारांनी केला असता भुजबळ म्हणाले की, आमच्या दिल्लीतील नेत्यांना कॉंग्रेसच्या नेत्यांशी राज्यसभेत किंवा इतर ठिकाणी भेटता आलं असतं. त्यांनी योग्य वेळी भेटायला हवं होतं. पण भेट झाली नाही असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com