Prithviraj Jachak  Sarkarnama
पुणे

Chhatrapati Sugar Factory Result : पवार-भरणे-जाचक पॅनेलचे पृथ्वीराज जाचकांसह चौघांची निर्णायक विजयी आघाडीकडे वाटचाल

Indapur Political News : छत्रपती कारखान्याच्या पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटाची मतमोजणी चालू आहे. पहिल्या दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. आता तिसऱ्या फेरीची मतमोजणी चालू आहे.

Vijaykumar Dudhale, ​राजकुमार थोरात

Pune, 19 May : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनेलने निर्णायक विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीतील दोन गटातील मतमोजणी पूर्ण झाली असून त्यात जय भवानीमाता पॅनेलचे पृथ्वीराज जाचक, ॲड. शरद जामदार, शिवाजी निंबाळकर आणि रामचंद्र निंबाळकर या चारही उमेदवारांची मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरू आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Chhatrapati sugar Factory Election ) रविवारी (ता. 19 मे) 75 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सोमवारी (ता. 19 मे) सकाळपासून बारामतीत सुरू आहे. सकाळी आठपासून मतपत्रिकांचे गठ्ठे बांधून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार असून त्यासाठी 38 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. बॅलेट पेपरमुळे मतमोजणीला विलंब होत आहे. तसेच, प्रशासनाकडूनही विलंबाने मतमोजणी होत आहे.

पहिल्या फेरीमध्ये गट नंबर एकमधून पवार, भरणे, जाचक गटाचे श्री जय भवानीमाता पॅनेलचे उमेदवार पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak ) आणि ॲड. शरद जामदार आघाडी यांनी निर्णायक विजयी आघाडी घेतली आहे. पृथ्वीराज जाचक यांना ५४२७ मते मिळाली, ॲड जामदार यांना ४७७७ मते मिळाली आहेत. याच गटातील विरोधी पॅनेलमधील उमेदवार संजय निंबाळकर यांना ३०१७, तर प्रताप पवार यांना २८१८ मते मिळाली आहेत.

दुसऱ्या गटामध्येही पवार, भरणे, जाचक गटाच्या श्री जय भवानीमाता पॅनेलचे उमेदवार शिवाजी निंबाळकर यांना ४६७४ आणि रामचंद्र निंबाळकर यांना ५०१६ मते मिळाल आहे. विरोधातील श्री छत्रपती बचाव पॅनेलचे उमेदवार शिवाजी संग्राम निंबाळकर यांना ३२८९, तर महादेव शिरसट यांना २४६९ मते मिळाली आहेत.

गट नं १

पृथ्वीराज साहेबराव जाचक : 5427

शरद जामदार : 4553

सोमनाथ निंबाळकर : 3017

प्रताप पवार :2688

बाद मते - 324

गट नं २

रामचंद्र निंबाळकर : 5016

शिवाजी निंबाळकर : 4674

संग्रामसिंह निंबाळकर : 3289

महादेव शिरसट : 2469

अभयसिंह निंबाळकर : 102

शहाजी निंबाळकर : 39

बाद मते-444

छत्रपती कारखान्याच्या पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटाची मतमोजणी चालू आहे. पहिल्या दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. आता तिसऱ्या फेरीची मतमोजणी चालू आहे.

छत्रपतीचा सभासद सुज्ञ आहे : पृथ्वीराज जाचक

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत पवार, भरणे आणि जाचक यांच्या पॅनेलने निर्णायक आघाडी घेतली आहे. त्याबाबत साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘छत्रपती सहकारी साखर काखान्याचा सभासद सुज्ञ आहे. सभासदांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला आहे, त्याबद्दल सभासदांचे आभार मानतो,’ असेही सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT