Eknath Shinde in Pimpri-Chinchwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता. १६) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी यावेळी त्यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत दाखले वाटप आणि बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन दिवसभर व्यस्त होते. याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला. शहरवासियांना दिवसाआड मिळणारे पाणीही शुक्रवारी मिळाले नाही. त्याचा त्रास नागिरकांना सहन करावा लागला. (Latest Marathi News)
महापालिकेत भाजपची सत्ता २०१७ ला आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआ़ड पाणीपुरवठा सुरु झाला.तो अद्याप कायमच आहे. गुरुवारी (ता.१५) त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी शट डाऊन घेण्यात आला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला. टर्ननुसार शहराच्या काही भागात गुरुवारी पाणी येणार होते. मात्र, या शट डाऊनमुळे ते आले नाही.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याने अधिकाऱ्या शुक्रवारीही (ता.१६) पाणी पुरवठा करता आला नाही. यामुळे पाण्याअभावी रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यासाठी विचारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांना नागरिकांनी फोन केले. मात्र त्यांना प्रतिसादच मिळाला नाही. सध्या प्रशासकीय कारभार असल्याने नगरसेवकांनाही फोन करुन उपयोग झाला नाही. दुसरीकडे त्यांचेही फोन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले नाहीच.
संपूर्ण पालिका प्रशासन हे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त राहिल्याने शहरवासियांना रात्री उशीरापर्यंतह पाणी मिळालेले नव्हते. त्यामुळे अगोदरच दिवसाआड पाण्यामुळे होत असलेल्या त्यांच्या हालात आणखी भर पडली. या प्रकारामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमात गोंधळ
नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशीरा शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु झाल्याने मुख्य दाखले वाटपाचे काम झालेच नाही. सव्वानऊशे तयार दाखले कार्यक्रम संपल्यानंतर वाटण्यात आले. तर, काही हे ई सेवा केंद्रांच्या हवाली करण्यात आले. श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही कल्याणकारी योजनांच्या लाभांचे वाटपही असेच करण्यात आले.
कमी प्रतिसादामुळे मुख्यमंत्री नाराज
शासन आपल्या दारी योजनेतील सर्वात कमी गर्दी असलेला पिंपरी-चिंचवडचा कार्यक्रम ठरला. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली. राज्यात इतरत्र या उपक्रमाला हजारोंची गर्दी पाहिली. पण, इथे ती कमी दिसत आहे, असे ते म्हणाले. मात्र, कमी माणसे असली, तरी ती माझी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा पहिला टप्पा असल्याचे सांगत पुढच्यावेळी दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात मोठा मांडव घाला, असे ते महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे पाहत म्हणाले.
शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनीही त्यातूनच हा उपक्रम उद्या व परवाही घेण्यास प्रशासनाला सांगितले. या लाभार्थ्यांकडे दरवर्षी उत्पनाचा दाखला मागणे बंद करावा, अशी मागणी चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप यावेळी यांनी केली. ती अंशत मान्य करताना आता तो वर्षासाठी नाही, तर पाच वर्षासाठी देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.