Mohan Joshi-Pune Corporation Sarkarnama
पुणे

Pune Politic's : ‘भाजप नेत्यांनी मोठमोठ्या गप्पा मारल्या, मंत्र्यांचे सत्कार झाले, पण नऊ वर्षांत 50 टक्केही....’ : भाजपच्या कारभारावर काँग्रेसची टीका

Mohan Joshi criticizes BJP : पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मोठा नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन तब्बल नऊ वर्षे झाली तरी अजूनही निम्मेही काम पूर्ण झालेले नाही.

Sudesh Mitkar

Pune, 20 March : पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मोठा नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन तब्बल नऊ वर्षे झाली तरी अजूनही निम्मेही काम पूर्ण झालेले नाही. प्रकल्पाबाबत भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. निवडणूक प्रचारात मोठंमोठी आश्वासने भाजप नेत्यांनी दिली. मात्र, आता हे सर्व नेते निवांत असल्याची टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे महापालिकेचा (Pune Corporation) नदी सुधार प्रकल्पाच्या (जायका प्रकल्पाच्या) कामाची प्रगती ५० टक्क्यांपेक्षा अधिक नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना, रिंगरोड, मेट्रोचे शहरभर जाळे अशा मोठमोठ्या घोषणा भाजपने केल्या होत्या.

जायका प्रकल्पही (Jaika Project) सुद्धा त्यातीलच एक घोषणा आहे. या सर्वच घोषणा अर्धवट अवस्थेत असून निवडणुका झालेल्या असल्याने भाजपचे मंत्री, खासदार, आमदार असे सर्वच जण या बाबत सोयीस्कर मौन पाळून आहेत, अशी टीकाही मोहन जोशी यांनी केली.

मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा शेतीसाठी फेरवापर करावयाचा, असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत राबविला जात आहे. केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर पर्यावरण असताना तो प्रकल्प मंजूर झाला आहे. या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात जावडेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याचा भाजपने गाजावाजा, खूप मोठी प्रसिद्धी केली होती.

भाजपने निवडणूक प्रचारात आश्वासने विविध आश्वासने दिली. प्रत्यक्षात २०१६ मध्ये कामाला सुरुवात झाली. त्या कामाला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन ९ वर्षे लोटली आहे. मुदतीत ५० टक्क्यांहूनही अधिक काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे पालिका प्रशासन मुदतवाढ मागत आहे.

मध्यंतरी जादा पाणी वापराबद्दल राज्य सरकारने महापालिकेला दंड ठोठावला आहे. त्याही वेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका अपयशी होत असल्याचा ठपका महायुतीच्या सरकारने ठेवला होता. या प्रकरणी एकंदरच टोलवाटोलवी आणि भाजपचा नाकर्तेपणा दिसून येतो, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT