Disha Salian Death : पाच वर्षानंतर दोन फोटो समोर! खरंच दिशा 14 व्या मजल्यावरून पडली का?

Disha Salian Mysterious Death : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला कलाटणी देणारी आज घटना घडली आहे. तिच्या वडिलांसह कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल गंभीर आरोप केले आहेत.
Disha Salian
Disha Saliansarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिशा सालियानचा पाच वर्षापूर्वीच्या मृत्यू झाला होता. याप्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असून ठाकरे गटाने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव यात समोर आले आहे. तर या प्रकरणात थेट तिच्या वडिलांनीच उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करत प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून याचे पडसाद विधीमंडळात देखील आज उमटले असून आदित्य ठाकरे यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. यादरम्यान आता तिच्या कुटुंबियांनी आता दिशा सालियान अंत्यविधीवेळेच्या फोटोवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. दिशाचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतरच ती आत्महत्या की हत्या अशी चर्चा रंगली होती. तर याच मुद्यावरून अनेकदा नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं होते. दरम्यान या प्रकरणी एसआयटी मार्फत तपास करण्यात आला आहे.

दिशाच्या मृत्यू नंतर आता पाच वर्ष होत असताना हे प्रकरण शांत होते. पण आता तिच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका आणि तिच्या अंत्यविधीचे दोन फोटो व्हायरल झाल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे. याच फोटोवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. या फोटोवरून दिशाचा मृत्यू नक्की 14 व्या मजल्यावरून पडून झाला की? असा सवाल उपस्थित केला आहे. तर ती पडली असेल तर तिच्या चेहऱ्यावर एकही डाग कसा नाही असा सवाल आता केला जातोय.

Disha Salian
Disha Salian Murder Case : दिशा सालियन हत्याप्रकरणी वडील कोर्टात; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आता समोर आलेले फोटो दिशाच्या अंत्यविधीचे असून तिच्या संपूर्ण शरीरावर कफन आहे. पण या फोटोत तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही इजा झालेले दिसत नाही. साधं खरचटलं सुद्धा नाही. याच मुद्द्यावरून आता वातावरण गरम झालं असून तिच्या वडिलांनी देखील याच तर्कावरून न्यायालयात दाद मागितली आहे.

Disha Salian
Disha Salian Murder Case : दिशा सालियन हत्याप्रकरणी वडील कोर्टात; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान या आरोपानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना विधानसभेच्या कार्यपद्धतीवरून सरकारवर आरोप केले आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे प्रकरण सुरू असून पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे कोर्टात बोलू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com