Disha Salian Death case : ठाकरेंच्या बचावासाठी शिंंदेंचा आमदार मैदानात; ‘एकाही नेत्याचा सहभाग आढळला नाही,...तीन वर्षांपासून आमचंच सरकार, मग दबाव कुठे?’

Maharashtra Politic's : तपास यंत्रणांवर विश्वास नसल्यामुळे दिशा सालियान हिचे कुटुंबीय आज उच्च न्यायालयात गेले आहेत. तपास यंत्रणांना उच्च न्यायालयाने पुन्हा तपासाचे आदेश दिले तरी त्यातून काही वेगळं निघेल, असं मला वाटत नाही, असा विश्वासही आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.
AadityaThackeray-Disha Salian-Sanjay Gaikwad
AadityaThackeray-Disha Salian-Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 March : दिशा सालियान हिच्यावर सामूहीक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे, त्या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा, यासाठी तिचे कुटुंबीय मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर राज्यात पुन्हा एकदा चिखलफेक सुरू झाली आहे. मंत्री नीतेश राणे यांनी नेहमी प्रमाणे ठाकरेंच्या विरोधात तलवार उपसली आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या बचावासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी आमदार गायकवाड यांनी जोरदार बॅटिंग केली आहे.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, दिशा सालियान हिचा मृत्यू चौदाव्या मजल्यावरून पडून पाच वर्षांपूर्वी झालेला आहे. दिशाचा करुण अंत झाला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडीने) तपास केला. त्या काळात ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले होते, त्या पैकी एकाही नेत्याचा त्या प्रकरणात सहभाग आहे, असे तपासात यंत्रणांना आढळून आलेले नाही. दिशा सालियान तथाकथित खून प्रकरणात कोणत्याही ॲंगलने सहभाग दिसलेला नाही.

तपास यंत्रणांवर विश्वास नसल्यामुळे दिशा सालियान (Disha Salian ) हिचे कुटुंबीय आज उच्च न्यायालयात गेले आहेत. तपास यंत्रणांना उच्च न्यायालयाने पुन्हा तपासाचे आदेश दिले तरी त्यातून काही वेगळं निघेल, असं मला वाटत नाही, असा विश्वासही आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांची मी पाठराखण करत नाही, तर तपास यंत्रणांनी जो अहवाल सादर केलेला आहे, त्यावर मी बोलत आहे आणि जे सत्य आहे, त्यावर मी बोलत आहे. आदित्य ठाकरे यांची पाठराखण करायची आणि नीतेश राणे यांना विरोध करायचा, असा यामध्ये कोणताही भाग नाही, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

AadityaThackeray-Disha Salian-Sanjay Gaikwad
Rashmi Karandikar: महाराष्ट्रातील IPS अधिकारी अडचणीत; गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स

गायकवाड म्हणाले, एखादी दुर्घटना आहे आणि त्याला खूनाचे स्वरूप देऊन ज्यांचा या प्रकरणाचा काही संबंध नाही, त्यांचं नाव घेणं, हे वैयक्तीक माझ्या मनाला पटत नाही. कोणाकडे काय पुरावे आहेत, त्यांनी द्यावेत, असे आवाहन त्याचवेळी सीआयडीकडून करण्यात आले होते. मला वाटतंय पुरावे नसतील, म्हणूनच त्यांना क्लीनचिट मिळालेली आहे. त्यामुळे आता त्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही.

दिशा सालियान प्रकरणात आरोप केलेल्या एकाही नेत्याचा सहभाग नसल्याचे सीआयडीने त्याचवेळी क्लिअर केलेले आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचवेळी कोणाकडे काय पुरावे असतील, त्यांनी ते द्यावेत, असे आवाहन केले होते. सीआयडीचे अधिकारी सांगतात की, यामध्ये आम्हाला कोणताही राजकीय संबंध आढळत नाही, याचा अर्थ पुरावा नाही, असा हेातो, असेही आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.

AadityaThackeray-Disha Salian-Sanjay Gaikwad
Nitesh Rane : 'गोऱ्या गोमटा चेहऱ्यामागे कोण मोठा बलात्कारी', राजीनामा द्या; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

महाविकास आघाडी सरकारचा सीआयडीवर दबाव होता, असा आरोप होत आहे. त्याबाबत आमदार संजय गायकवाड म्हणाले, पण, आमच्या महायुतीचे गेल्या तीन वर्षांपासून राज्यात सरकार आहे ना. तेव्हा तर कोणाचा दबाव नव्हता ना, बरोबर ना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com