Ajit Pawar Sunil Kedar sarkarnama
पुणे

Sunil Kedar : काँग्रेसचा आमदार अजितदादांना भिडला; ओपन चॅलेंज देत म्हणाला, 'त्यांनी नागपूरला यावं नाहीतर मी बारामतीमध्ये येतो अन्...'

Roshan More

Loksabha Election : 'याला मंत्री होण्याची स्वप्न पडतात. पण मंत्री होण्याआधी तू आमदार कसा होतो, तेच बघतो', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर मतदारसंघातील सभेत थेट आमदार अशोक पवार यांना चॅलेंज दिले. त्यावरून अजितदादांना फार पूर्वीपासून दम देण्याची सवय आहे. ती त्यांची पद्धत आहे. त्यांच्या पक्षातील सर्वांना त्याची सवय झाली आहे. त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही, असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांना टोल लगावला. तर, काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले.

'हा कसा निवडून येतो, तो कसा निवडून येतो, असं म्हणून कॉलर पकडून मत मिळत नाहीत.जर निवडून कसा येतो, हे बघायचं असेल तर त्यांनी नागपूरला यावं. नाहीतर मी बारामतीमध्ये येतो.', अस म्हणत आमदार सुनील केदार Sunil Kedar यांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या अशोक पवार Ashok Pawar यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी अशोक पवार यांची भेट घेत 'स्वाभिमानी जनता आणि याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची साथ असल्याने कसे निवडून येत नाहीत हेच आम्ही पाहतो.', असे ट्विट करत अजित पवारांना टोला लगावला.

सुनील केदारांवर पुण्याची जबाबदारी

पुणे लोकसभा मतदारसंघात विदर्भातील सहा ते दहा आमदार सक्रिय आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना आमदार सुनील केदार यांच्या पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुनील केदार हे पुण्यात ठाम मांडून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT