Andekar Family in Pune Election : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाने अडवलेलं नाही. “निवडणूक लढवणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत व घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी कोणत्याही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांच्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत.
सध्या वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आला होता. या प्रकरणी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांच्यासह एकूण 15 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तरीही या तिघांना निवडणूक लढवता येणार असल्याचा आता स्पष्ट झाला आहे. मात्र, आंदेकर कुटुंब हे पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी निगडीत राहिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की ते अपक्ष लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, याच आंदेकर कुटुंबाला यापूर्वी उमेदवारी देऊन निवडून आणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (AP) शहराध्यक्ष सुभाष जगताप माध्यमांशी बोलताना म्हणाले, "वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे 2017 ते 2022 या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून महापालिकेत होते. त्यापूर्वीपासूनच बंडू आंदेकर हे गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित राहिले आहेत. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर त्यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपासामध्ये काही बाबी समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व कोर्टामध्ये सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आंदेकर यांना उमेदवारी द्यायची का नाही? याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेणार आहे. बंडू आंदेकर यांना आम्ही उमेदवारी देणार नाही. मात्र, या दोन महिलांबाबत तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी त्या दोन्ही महिलांनी आमच्याकडे उमेदवारी अर्जाची मागणी करणे आवश्यक आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागितलाच नाही तर आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकणार नाही असंही जगताप यांनी म्हटलं आहे.
आंदेकर आमच्याच पक्षात आहे. मात्र, पक्षाच्या नियमानुसार त्यांना पक्षाकडं अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर पक्ष त्यावर निर्णय घेईल. यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही आजची नाही तर गेल्या 40 वर्षापासून ते गुन्हेगारी क्षेत्रात आहेत, असं असताना देखील त्यांच्या घरातून मागील काळात अनेक मंडळी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तेव्हा कुणीच काही बोललं नाही. यापूर्वी देखील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं काम असेल तर जनता त्यांना निवडून देते नाहीतर त्यांचा पराभव करते तो जनतेचा निर्णय असतो असंही जगताप यांनी आंदेकर कुटुंबियांच्या उमेदवारीवर भाष्य करताना म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.