Darshana Pawar, Rahul Handore Sarkarnama
पुणे

Darshana Pawar Death Case : दर्शनाच्या खूनानंतर आरोपी राहुल हंडोरेने 'अशी' केली पोलिसांची दिशाभूल; तपासात झाला 'प्लॅन' उघड

Police Enquiry Rahul Handore : आरोपीने सहप्रवाशांची घेतली वारंवार मदत

सरकारनामा ब्यूरो

Darshana Pawar Death And Rahul Handore : 'एमपीएससी' परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्येचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी चोखपणे सुरू केला आहे. या प्रकरणातील अनेक तपशील आता समोर येत आहे. आरोपी राहुल हंडोरे याने गुन्ह्यानंतर पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक राज्यात फिरला. पोलिसांना आपले ठिकाण समजू नये यासाठी त्यांने कसोशीने प्रयत्न केले. ही माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. (Rahul Handore And Darshana Pawar)

दर्शना आणि राहुल हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. त्याचे घर तिच्या मामाच्या घराजवळ आहे. ते दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. राहुल 'एमपीएससी'ची तयारी करताना अर्धवेळ नोकरीही करीत होता. राहुलने तिच्या घरच्यांसमोर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यांनी नकार दिला होता. दरम्यान, दर्शनाची आरएफओ म्हणून निवड झाली. यानंतर राहुलने तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी राहुलने बचावासाठी कायकाय केले हे तपासातून समोर येत आहे.

पुणे-सांगली-गोवा-चंदीगड-हावडा प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हंडोरे (Rahul Handore) याने केवळ पळून जाण्यासाठीच नव्हे तर पोलिसांची दिशाभूल करण्याचाही खूप प्रयत्न केला. १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर हंडोरे यांनी तातडीने पुणे सोडले. त्यानंतर त्याने रेल्वेने प्रवास सुरू केला. त्याचा पहिला मुक्काम सांगलीत होता. त्यानंतर त्याने गोवा गाठले. तेथून हंडोरे थेट चंदीगडला गेला होता. तेथेही तो थांबला नाही. त्यानंतर पश्चिम बंगालमधील हावडा गाठले. हा प्रवास त्याने रेल्वेने केला होता.

दिशाभूल करणारे डावपेच

कमी दिवसात राहुलने केलेला प्रवास थक्क करणारा वाटू शकतो. या प्रवासातून मात्र त्याचा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळी त्याने मोबाईलचे लोकेशन ट्रेस होऊ नये याचीही काळजी घेतल्याची दिसून येते. संपूर्ण प्रवाशात त्याने आपला मोबाईल बंद ठेला होता. हावडाहून रेल्वेने मुंबईला आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

कुटुंब -मित्रांशी वारंवार संपर्क

प्रवासात आरोपी राहुल हंडोरे याने आपल्या इतर प्रवाशांचे फोनद्वारे कुटुंबीयांना कॉल केले होते. त्याने पाच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधला. हंडोरे प्रवासादरम्यान भेटलेल्या प्रवाशांना विनंती करून फोन घेत होता. त्याच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना त्याच्या हालचालींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारेच तो अंधेरी स्थानकावर येत असल्याचे स्पष्ट झाले.

प्रवाशांची घेतली मदत

आपला फोन बंद ठेऊन इतरांच्या फोनवरून संपर्क करणे, तसेच वारंवार ठिकाणे बदलणे यातून आरोपीने पोलिसांना चकवा देण्याचाच प्रयत्न केला. या प्रवासात त्याने अनेकांकडे जेवणासाठी विनंती केली. प्रवाशांनाही त्याला मदत केली. त्याच्या फोन कॉल्सच्या आधारे तपास पथके त्याचा ठावठिकाणा शोधतील, असे गृहीत धरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याची त्याची योजना होती. तथापि, तो इतर लोकांचे फोन वापरत होता. तसेच संपर्क साधल्यानंतर तातडीने ठिकाणे बदलत होता. त्यामुळे त्याला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते.

...अखेर केली अटक

राहुल हंडोरे मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. अटकेच्या वेळी तो अंधेरीहून पुण्याला जात होता. दरम्यान, हंडोरेने दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्येपूर्वी तिच्यासोबत ट्रेक केले होते. त्या ट्रेकमध्ये त्याने कटर किंवा ब्लेड नेले होते का, याचाही तपास अधिकारी करत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT