Shrikant Pathak sarkarnama
पुणे

दोन वर्षांपासून मागणी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याची अखेर बदली!

त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची दोन वेळा बदली झाली; परंतु सरकारने त्यांना एकाच पदावर कायम ठेवले होते.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची सर्वसाधारणपणे दोन वर्षांत बदली होते. पण, राज्यात एक उपमहानिरीक्षक दर्जाचे आयपीएस (ips) अधिकारी यांची तब्बल साडेचार वर्षांनंतर बदली झाली आहे. त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची दोन वेळा बदली झाली; परंतु सरकारने त्यांना एकाच पदावर कायम ठेवले होते. (Daund IPS officer Shrikant Pathak finally transferred to Mumbai)

दौंड (Daund) शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे समादेशक श्रीकांत पाठक असे त्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नाव आहे. सरकारकडे विनंती करूनही त्यांची बदली करण्यात आली नव्हती. पाठक यांनी १५ मे २०१७ रोजी दौंड येथे समादेशक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सन १९६६ मध्ये स्थापन झालेल्या या एसआरपीएफ गटाचे पाठक हे बेचाळीसावे समादेशक होते.

सुमारे चार महिन्यांपूर्वी पाठक यांच्या मुंबई पोलिस दलात उपायुक्त पदावर बदलीचा आदेश निघाला होता. पण, पोलिस भरती असल्याने श्रीकांत पाठक यांना सोडण्यात आले नव्हते. भरतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तब्बल ४ वर्षे ८ महिने आणि ५ दिवसानंतर म्हणजे १९ जानेवारी रोजी त्यांची बदली झाली. पदभार सोडल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. गटातील अधिकारी, कर्मचारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांनी फुलांचा वर्षाव करून निरोप दिला.

दौंड येथील कार्यकाळात श्रीकांत पाठक यांना २०१८ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. त्याशिवाय उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. कृषी विज्ञान शाखेचे द्विपदवीधर असणारे पाठक यांनी गटाच्या २०२ एकर क्षेत्रातील माळरानावर १४ हजार विविध रोपांची लागवड करीत त्याचे संवर्धन केल्याने राज्य सरकारने या गटास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविले होते.

दौंडमधील कार्यकाळ अतिशय चांगला

श्रीकांत पाठक यांना प्रदीर्घ कालावधीविषयी विचारले असता ते म्हणाले की, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडे बदलीसाठी विनंती केली, पण होऊ शकली नव्हती. तो सरकारचा निर्णय आहे. सेवाकाळातील माझा दौंडमधील कार्यकाळ अतिशय चांगला होता. येथील कारकिर्दीबद्दल समाधानी आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT