पारनेर ( जि. अहमदनगर ) : पारनेर नगर पंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) हा सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला आहे. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र आज पारनेरमध्ये एक मोठी राजकीय उलथा पालथ आमदार लंके यांनी घडविल्याने पारनेर नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. (Nilesh Lanke Marathi News Updates)
पारनेर नगर पंचायतमध्ये 17 नगरसेवक आहेत. त्यातील राष्ट्रवादीचे 7, शिवसेनेचे 6, अपक्ष 1, शहर विकास आघाडी 2 तर भाजपचा 1 नगरसेवक आहे. सत्ता मिळविण्यासाठी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष एक नगरसेविकेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
पारनेर नगरपंचायतच्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आज (ता. 21 ) सकाळी आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल 8 वर जाऊन पोचले आहे.
काल ( बुधवारी ) निकालानंतर आमदार नीलेश लंके यांनी आमचे सात नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल. असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. आत त्यांचे आठ सदस्य, झाल्याने पुन्हा एकदा आमदार लंके यांनी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.(Nilesh Lanke Marathi News Updates)
पारनेर नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे निकालानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. निकालानंतर रात्रीच राजकीय बैठका सुरू झाल्या होत्या. त्रिशंकू स्थितीमुळे राष्ट्रवादीला शहर विकास आघाडी व अपक्ष पाठिंबा देतील अशी चर्चा होती मात्र भालेकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पारनेर शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विकास आघाडीचे प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्या मध्यस्तीने भालेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. भालेकर यांच्या प्रवेशाने व चेडे यांच्या मध्यस्तीने तालुक्यात आता वेगळे राजकीय समीकरण सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भालेकर यांच्या प्रवेशाच्या वेळी चंद्रकांत चेडे, नवनिर्वाचित नगरसेवक नितीन अडसूळ, अॅड राहुल झावरे, बाळासाहेब मते, विजय औटी, सचिन औटी आदी उपस्थित होते.
दरम्यान शहर विकासाच्या मुद्यावर आणखी एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गतनोंदणी बरोबरच सत्तास्थापणेच्या हालचालींना वेग आला आहे.
पारनेर शहराचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागेल या साठी व केवळ शहराच्या विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
- सुरेखा अर्जुन भालेकर, नवनिर्वाचित नगरसेविका
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.