SRPF Exam Cancelled Sarkarnama
पुणे

SRPF Recruitment Case: दौंड SRPF पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर; युनिटचा 'कमांडंट'च निघाला 'मास्टरमाईंड'

Pune Daund SRPF Paper Leak : पुणे येथील महाराष्ट्र राज्य उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल यांनी दौंड पेपरफुटी प्रकरणानंतर सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

Deepak Kulkarni

Pune News: देशभरात गाजत असलेल्या NEET पेपर फुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेतही घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.SRPF च्या परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्न एकाच पुस्तकातील प्रश्न घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

दौंड पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणात युनिटचा कमाडंट तुषार पाटील याला दोषी ठरवण्यात आलं आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे याप्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल पाठवण्यात आला आहे.

दौंड येथील एसआरपीएफ गट क्रमांक 5 च्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 2 मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातील पुस्तकातून जसेच्या तसे उचलल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर एसआरपीएफ परीक्षा रद्द करण्यात आली.संबंधित परीक्षा आता 24 मे रोजी घेतली जाणार आहे.

दौंड पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून युनिटचे समादेशक तथा भरतीप्रमुख तुषार पाटील यांचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणानंतर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली असून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले गेले आहेत.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल यांनी दौंड पेपरफुटी प्रकरणानंतर सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोठ्या निर्णयामुळे एसआरपीएफच्या भरती प्रक्रियेतील परीक्षार्थी उमेदवारांना आता पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. एसआरपीएफ गट 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा आता 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी, दौंड येथे होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT