Baramati, 16 January : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी वाल्मिक कराडवर ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे आज परळीच्या दौऱ्यावर आहेत. कराडवर मोक्काची कारवाई झाल्यानंतर ते प्रथमच परळीत दाखल झाले असून इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. बीडच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असे विधान त्यांनी केले आहे.
सिने अभिनेते सैफअली खान यांच्यावरील हल्ल्यानंतर माध्यमाशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीडच्या घटनेसंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसेच त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीडच्या घटनेसंर्दभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. गुन्हेगारी घटनांचा परिणाम राज्यातील गुंतवणुकीवर होत आहे, त्यामुळे गुन्हेगारी घटनांना तातडीने पायबंद घालावा. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशीही सर्वपक्षीय लोकांची मागणी आहे.
सैफअली खानवरील हल्ल्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सैफअली खानच्या संपूर्ण फॅमिलीबरोबर मी बोलले आहे. पोलिस आयुक्तांशीही माझे बोलणे झाले आहे. त्या विभागाच्या पोलिस उपायुक्तांशी मी बोलले आहे. तो माणूस सैफअली खानच्या घरात कसा गेला, हे पाहवं लागेल. सर्व सुरक्षा असताना, तसेच, सर्व प्रवेश ॲाटोमॅटिक असताना तो आत गेला कसा? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सैफअली खानच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षेची गरज आहे, ती तातडीनं दिली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सैफअली खानबरेाबच संतोष देशमुख आणि परभणीतील कुटुंबाला सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे, असेही सुळे यांनी म्हटलं आहे.
मनाला अस्वस्थ करणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. लोकांना बाहेर फिरायला भीती वाटायला लागली आहे. पुण्यातील गुन्हेगारीही मागील सहा महिन्यांत प्रचंड वाढली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परीसरात गुन्हेगारी घडत असेल तर गंभीर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढतोय, इकनॉमिक डीस्ट्रेस वाढला की क्राईम वाढतो, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.