Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी सात दिवसांपासून उपोषण; मुख्यमंत्र्यांना बारामतीत येण्याचे उपोषणकर्त्यांचे आवाहन

Eknath Shinde : सरकारकडून धनगर समाजाला 50 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता दोन दिवसांत संपत आहे.

Ganesh Thombare

Pune News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली, तर सरकारकडून धनगर समाजाला 50 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता दोन दिवसांत संपत आहे. सरकारने अद्यापही आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप धनगर समाजाकडून करण्यात येत आहे.

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे उपोषणाला बसलेले आहेत. बारामतीतील प्रशासकीय भवनाबाहेर चंद्रकांत वाघमोडे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांचा उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना केली, पण जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे येत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा चंद्रकांत वाघमोडे यांनी घेतला आहे. सरकारने 50 दिवसांत काय केलं, हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, शासनाचा प्रतिनिधी याचे उत्तर देऊ शकणार नाहीत. याचे उत्तर हे मुख्यमंत्री देऊ शकतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी येथे यावे किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांना पाठवावे, अशी मागणी उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यानंतर येथून निघून गेले. दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तुमचा विषय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करते, असा आश्वासन दिले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे उपोषणस्थळी येऊन मुख्यमंत्री यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.

तसेच उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी जिल्हाधिकारी यांचे बोलणे करून दिले. त्यानंतर आज जिल्हाधिकारी या ठिकाणी भेटीसाठी आले होते. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री शिंदे बारामतीत येतात का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT