Pune News, March 12, 2026: शैक्षणिक संस्थेच्या मालकीच्या जागेवर विनापरवानगी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत होते, हे लक्षात आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार मध्यरात्री रस्त्याचे सुरु असलेल्या काँक्रीटीकरणावर जाऊन बसले.
पोलीस प्रशासनाने घटना स्थळी येऊन पाहणी केली. माजी आमदारांची भेट घेतली आहे. पण हे काम बंद केल्याशिवाय आपण या ठिकाणाहून उठणार नाही, अशी ठाम भूमिका माजी आमदारांनी घेतली आहे. काल मध्यरात्रीपासून सुरू झालेलं आंदोलन न्याय मिळेपर्यंत सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी केला आहे.
मनसेचे माजी आमदार दीपक पायगुडे हे पुण्यातील फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, याठिकाणी'नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा' चालवली जाते.
या शाळेच्या मालकीची जागेत परवानगी न घेता बुधवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारात अचानकपणे रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण सुरु करण्यात आले. याची माहिती मिळतात, पायगुडे यांना घटना स्थळी धाव घेतली. त्याच रस्त्यावर सिमेंटमध्ये जाऊन बसले व त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.
"शाळेच्या जागेजवळ क्रिकेटचे मैदान आहे. ही आमच्या मालकीची जागा आहे. आमची परवानगी न घेता ग्रामपंचायचीने रस्त्याचे काम सुरु केले आहे. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले आहे, पण त्यांनी दखल घेतली नाही, मी आता बेमुदत उपोषणास बसलो आहे. हे काम थांबवले नाही तर उद्या विधीमंडळाचे सुरु असलेल्या अधिवेशनात उडी मारेल, असा इशारा पायगुडे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
1999 मध्ये या ठिकाणी सैनिकी शाळा सुरु केली. या परिसरात आमचं क्रिकेटचे मैदान आहे. त्या मैदानाची जागा कमी होऊन भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने होणार नाही, ज्यामुळे याठिकाणी रस्ता होणार नाही, यासाठी मी जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत यांना कळवले आहे. शाळेचे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका,संबधित अधिकारी याठिकाणी आले, त्यांनी सांगितले की आम्ही मिटींग घेऊन तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही, पण त्यांनी सकाळी काम सुरु केले, त्यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर आम्ही काम करणार नाही, असे सांगितले. पण पुन्हा रात्री हे काम सुरु केले.
मी पाच वर्ष आमदार, पाच वर्ष नगरसेवक होते. चाळीस वर्ष मी राजकारण, समाजकारणात आहे, माझ्यासारख्या माजी आमदारांवर अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येत, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल? असा सवाल पायगुडे यांनी उपस्थित केला. जोपर्यंत हे काम कायमस्वरुपी थांबवत नाही, तोपर्यंत मी येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.