Mumbai Coastal Road Melody Road : BMCचा प्रयोग फसला! महिनाभरातच प्रकल्प गुंडाळला; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Mumbai Coastal Road Noise Complaint News:एक महिना पूर्ण होताच ‘म्युझिकल’ रस्त्याचा 'स्वर'बदलला. स्थानिक नागरिकांना 'जय हो'ही नेहमी वाजणारी धून 'बेसूर' वाटू लागली, रहिवाशांनी थेट बीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली.
Mumbai Coastal Road Noise Complaint News
Mumbai Coastal Road Noise Complaint NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Coastal Road News:भारतातील पहिल्या ‘म्युझिकल’ रस्त्याचे दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्यानंतर या रस्त्याचे अन् बीएमसीचे कौतुक झाले. पण या प्रकल्पाला एक महिना पूर्ण होताच ‘म्युझिकल’ रस्त्याचा 'स्वर'बदलला. स्थानिक नागरिकांना 'जय हो'ही नेहमी वाजणारी धून 'बेसूर' वाटू लागली, रहिवाशांनी थेट बीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली.

सुरुवातीला ही कल्पना आकर्षक आणि नाविन्यपूर्ण म्हणून चर्चेत आली; मात्र काही आठवड्यांतच स्थानिक रहिवाशांनी आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली.

छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवरील संगीताबाबत तक्रारी आल्यानंतर बीएमसीने संबंधित असलेल्या कंत्राटदाराला तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक सल्लागाराला या परिसरातील डेसिबल मोजण्याचे आदेश दिलेले आहेत.

स्थानिक नागरिकांनी कोणताही त्रास न होता हा प्रकल्प कसा सुरु राहिल किंवा अजून काय बदल करता येईल याबाबतचाही अभ्यास करुन अहवाल द्यावा, अशा सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात या ‘म्युझिकल’ रस्त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची चर्चा जागतिक स्तरावर रंगली आहे. पण गाड्या त्या भागातून जाताच जय हो वाजू लागतं. मात्र दर मिनिटाला शेकडो गाड्या जात असल्यामुळे स्थानिकांना सतत ‘जय हो’ ऐकणे सक्तीचे झाल्याने ते संतप्त झाले आहेत.

कोस्टल रोडवरील एका विशिष्ट पट्ट्यात वाहनांची चाके विशेष रिब्सवरून गेल्यावर संगीतासारखा आवाज निर्माण होतो. या तंत्रज्ञानामुळे वाहनचालकांना प्रवास करताना ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येते. पण काही दिवसांतच हा संगीतमय मार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बीएमसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शहरातील प्रसिद्द छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर हा उपक्रम 11 फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेला होता. त्याला आज (ता. 11 मार्च) महिना पूर्ण होत आहे. परिसरातील सुमारे 650 कुटुंबियांनी सह्याकरुन मुंबई महापालिका आयुक्तांकडे रोडवरील संगीत बंद करण्याची मागणी केली आहे.

Mumbai Coastal Road Noise Complaint News
Sandip Shelke News: ठाकरेंच्या सेनापतीची काँग्रेससोबत 'हात' मिळवणी; विदर्भात 'मशाल' विझली

नागरिकांच्या काय तक्रारी आहेत?

  • सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत ही रस्त्यावरील जय हो ची धून वाजत असत.त्यामुळे परिसरातील शांतता पूर्णपणे भंग होत होती.

  • घराच्या खिडक्याही उघड्या पण ठेवता येत नव्हत्या. आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या झोपेवर परिणाम होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com