Chetan Tupe Sarkarnama
पुणे

Chetan Tupe: मराठा मोर्चाला आमदार चेतन तुपे फिरकलेच नाहीत; मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

Hadapsar : हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला आमदारांनी दांडी मारली, ससाणेनगर साखळी उपोषणाला त्यांनी भेट दिली असताना मराठा कार्यकर्त्यांनी जाब विचारून तुम्ही उपोषणाला बसू नका, तुम्ही विधानभवनात जाऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा तेव्हा उपरती होऊन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे पत्र दिले, सध्या हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती, त्यातून ते नगरसेवक झाले 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढवली व हडपसरमधून आमदार म्हणून निवडून आले

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना राज्यातून मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळत आहे.

हडपसर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य दिव्य मोर्चा हडपसरमध्ये काढण्यात आला. ओबीसी समाजाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मोर्चात सहभाग घेतला. मात्र, विद्यमान आमदार मराठा असूनही ते या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यानंतर ससाणेनगर येथे साखळी उपोषणास भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेव्हा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला तुम्ही इथे उपोषणाला बसू नका तर तुम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावर जाऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन विधानसभेत आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करा, मराठा समाजाने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले आहे, याची जाणीव ठेवून आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असे मराठा समाजाने सुनावल्यावर समाजाचा राग लक्षात घेऊन आम्ही चेतन तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी पत्र दिले आणि हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर वायरल केले. मात्र, त्या पत्रावरही अनेकांनी टीका केली आहे.

"राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने लक्ष देत नाही. जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास समाज आक्रमक होऊन मंत्री, खासदार, आमदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,' असा इशारा आयोजक संदीप लहाने पाटील यांनी या वेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT