Maratha Reservation : राणे, वडेट्टीवारांचे रेकॉर्डिंग व्हायरल करणारे रमेश पाटील पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील अनेक नेत्यांना ते फोन करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारत होते.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेत्यांना फोनाफोनी करून त्यांना जाब विचारणारे रमेश पाटील यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

भाजपचे नेते, मंत्री नारायण राणे, शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना रमेश पाटील यांनी फोन करून आरक्षणाबाबत प्रश्न विचारले होते. त्यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित नेत्यांवर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation News
Maratha Reservation : आरक्षणाचा माझा फॉर्म्युला सरकारला नको आहे का? राठोडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

गेल्या काही दिवसांपासून रमेश पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील बड्या नेत्यांना फोन करून प्रश्न विचारत होते. त्या फोन कॉलची रेकॉडिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करीत होते. त्यांच्या या व्हायरल क्लिपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाइक व त्यावर मोठ्या प्रमाणात कॉमेंट ही मिळत असल्याने त्यांच्या फॉलोवर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.

Maratha Reservation News
Bhanudas Murkute : विखे, थोरातांच्या कारखान्यांना क्षमता वाढीची परवानगी कशी मिळते? मुरकुटे संतापले

राज्यातील अनेक नेत्यांना ते फोन करून मराठा आरक्षणाचा प्रश्नावर जाब विचारत होते. त्यांच्यात आणि नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणाच्या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत असताना त्यातून नेत्यांशी त्यांचे वाद ही उफाळून आले. पुढे वाद निर्माण होऊ पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कायद्याच्या अॅक्टनुसार व राजकीय नेत्यांच्या वाद होईल ,अशा संभाषण किल्प सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज (बुधवारी) त्यांना संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Maratha Reservation News
Maratha Reservation : बार्शीमध्ये चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; दवाखान्यातच विषारी औषध...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com