Hardik Pandya News Sarkarnama
पुणे

Hardik Pandya News: हार्दिक पांड्याच्या विरोधात वकीलानं केली पोलिसांकडे तक्रार; गर्लफ्रेंड सोबतचा व्हिडीओ...

Pune Police Complaint News: क्रिकेटपटू हार्दिक पांड्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा यांच्यात नेमकं काय घडलं...

Sudesh Mitkar

Pune News: भारताने न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना जिंकून इतिहास रचला, पण जल्लोषाच्या आनंदात झालेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. काहींनी क्रिकेटर हार्दिक पांड्याचं उत्साहाचे समर्थन केले, तर काहींनी राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानाबाबत आक्षेप घेतला आहे.

भारताने टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकल्याच्या जल्लोषात स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या एका नव्या वादात सापडले आहेत. पुण्यातील एका वकिलाने त्यांच्यावर राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करीत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ऍडव्होकेट वाजिद खान यांनी ही तक्रार दाखल केली असून, त्यात हार्दिक पांड्याने अंतिम सामना संपल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आनंद साजरा करताना तिरंगा अंगावर लपेटून अनुचित हालचाली केल्याचा दावा केला आहे.

विशेषतः त्यांच्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबतच्या वर्तनाचा उल्लेख करत, हे कृत्य राष्ट्रीय ध्वजाच्या प्रतिमेला धक्का लावणारे असल्याचे खान यांनी म्हटले आहे.

वकील खान यांनी तक्रारीसोबत संबंधित व्हिडिओ क्लिप्स जोडल्या आहेत.राष्ट्रीय ध्वज अधिनियम १९७१ अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांकडून FIR नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने तक्रार स्वीकारली आहे. तपास करण्याचा आश्वासन दिले आहे. मात्र घटना अहमदाबादमध्ये घडल्याने पुढील तपास कशा पद्धतीने करण्यात येणार याबाबत स्पष्टता आलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी फक्त तक्रार मिळाल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT