Haribhau Rathod, Chhagan Bhujbal Sarkarnama
पुणे

Haribhau Rathod News : 'ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत' ; माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप

Maratha Vs OBC : भावनात्मक भडकावून दोन समाजामध्ये तेढ

सरकारनामा ब्यूरो

Maratha Vs OBC : मराठा आरक्षणावरुन ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष सुरु आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देवू नये म्हणून विरोध केला आहे. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. अशी परिस्थिती असताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांवर आरोप केला आहे. (Haribhau Rathod accuses OBC leaders)

त्यांनी ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत, असे वक्तव्य केले आहे. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे जनजागरण यात्रा काढली आहे. त्यातून ओबीसींना भयभीत करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सरकारने सगेसोयऱ्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय चांगला आहे असे म्हटले आहे. तर मंत्री छगन भुजबळ हे आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोध नाही पण त्यांना ओबीसीमधून आरक्षण देवू नये असे सांगत आहेत.

पण ते कसे देणार हे मात्र सांगत नसल्याचे राठोड यांनी सांगितले आहे. हरिभाऊ राठोड म्हणाले, ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे जनजागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सरकारने सगेसोयऱ्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय चांगला आहे. उगाच ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत परंतु तेही सांगत नाही की, मराठा समाजाला आरक्षण देणार कसे.

एकीकडे ओबीसीला भावनात्मक भडकावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून भाजपात जाण्याची तयारी करत आहेत. म्हणजेच हे दोन्ही नेते बबन तायवडे आणि छगन भुजबळ हे नागपूरकडे झुकले आहेत. हे उघड - उघड ओबीसींना मूर्ख बनवत आहेत, असे विधान ओबीसी नेते, आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT