Ajit Pawar, Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil News : '...तरी मला चिंता नाही' ; हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना डिवचले...

Amol Sutar

Pune News : हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते. त्यामुळे चिंता करायचं काही काम नाही, अशी वक्तव्ये अनेकवेळा केली होती. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आता अजित पवारांना मिळाले आहे.

आयोगाच्या या निकालावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीबाबतही त्याच पद्धतीने निकाल आल्याने शरद पवार गट अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान या निकालावर भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यात त्यांनी राष्ट्रवादी अजित पवारांना मिळाली तरी मला चिंता नाही, असे सांगितले आहे.

तर बारामती लोकसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही. असं म्हणत पाटलांनी अजित पवारांना डिवचले. तर इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असे सूचक विधानही त्यांनी केले. मावळ मधील पिंपरी - चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते मावळ येथील नूतन विद्यापीठ पत्रकार परिषदेला हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचा असल्याचा मोठा निकाल दिला. असा निर्णय आला तरी मला कोणतीही चिंता करायची गरज नाही, अशी सूचक प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली. तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागते का ? या प्रश्नावर मला कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

तसेच बारामती लोकसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही असे म्हणत त्यांनी अजित पवारांना डिवचले. अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असे सूचक विधानही पाटलांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT