Pune News : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवार दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याने एकच एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णलयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले.
विशेष म्हणजे आज शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात गँगवॉर वाढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का? असा प्रश्न मीडिया प्रतिनिधीने पुण्यात फडणवीसांना (Devendra Fadnavis) विचारला असता, ते म्हणाले, 'कुठलाही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केली आहे. कुख्यात गुंड कोणीही असो, त्याचा बंदोबस्तच या शासनात केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचा गँगवॉर करण्याची कोणीही हिंमत करणार नाही.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोथरूड परिसरात शरद मोहोळ (Sharad Mohal) वर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी गोळीबार केला. गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले. पुण्यातील गँगवाॅर प्रकरणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शरद हिरामण मोहोळ (वय ४०, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्याविरोधात पुणे शहर, पिंपरी, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून (Murder) केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.