illegal Pakistani cosmetics; FDA Maharashtra And IAS Tukaram Mundhe sarkarnama
पुणे

FDA Tukaram Mundhe: मोठी बातमी: एफडीएच्या धडक कारवायांनी भेसळखोरांना दणका दिल्यानंतर तुकाराम मुंढेंचं पुढचं 'टार्गेट' ठरलं

Tukaram Mundhe Interview: तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात एकापाठोपाठ एक अशा धडक कारवायांनी भेसळखोरांची झोप उडवल्याचं दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

Pune News: प्रशासकीय सेवेतील धडाकेबाज आयएएस अधिकारी व राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांसह अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलीच धडकी भरवली आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पनीरमधील भेसळ आणि निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट्स यांच्याविरोधात कठोर कारवाई केली आहे. यानंतर आता त्यांचं पुढचं टार्गेटही जाहीर केलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात एकापाठोपाठ एक अशा धडक कारवायांनी भेसळखोरांची झोप उडवल्याचं दिसून येत आहे. आता त्यांच्या निशाण्यावर चायनीज फूड असणार असल्याचंही म्हटलं आहे.

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांचा आयएएस पदापर्यंतचा संघर्ष सांगताना काही आठवणींनाही उजाळा दिला.

तुकाराम मुंढे म्हणाले, मी कॉलेजला असताना पुणे विद्यापीठात चायनीज गाड्या असायच्या. पाषाण रोडला. मी विचार केला. तिथे जाऊन पाहावं का? माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लं. पण तोपर्यंत मला चायनीज फूड माहीत नव्हतं. आता भरपूर चायनीज फुडला डिमांड आहे. मी काही कारवाया केल्या. लोक म्हणतात, आता चायनीज फूडवर कारवाई करा म्हणतात. त्यामुळे आता पुढं चायनीज फूडवर लक्ष द्यायचं असल्याचं मुंढे यांनी या कार्यक्रमात म्हटलं.

तुकाराम मुंढेंनी या मुलाखतीत प्रशासकीय सेवेत असताना होत असलेल्या वारंवार होणाऱ्या बदल्यांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, सतत होत असलेल्या बदल्यांचा मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,' असं स्पष्ट मतही तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली.

...अन् टाळ्यांचा कडकडाट

तुकाराम मुंढेंनी त्यांच्या 'यूपीएससी'च्या तयारीदरम्यानचा 1996 चा एक किस्साही आवर्जून सांगितला. ते म्हणाले, 'दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यावेळी वेटरने ‘बियर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केला. तेथून बसने संभाजीनगर गाठले,' हे सांगताच सभागृहात उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पाहायला मिळालं.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. त्यांना मुलाखतीत उच्च न्यायालयाच्या कँन्टीनवरही तुम्ही छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान एखादा कॉक्रोच निघाला तर त्याला काय होतं, असं कँन्टीनचा चालक म्हणाला नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तुकाराम मुंढे यांनी ‘कॉक्रोच काय असतं, हे आपल्याला गेल्या काही दिवसांत कळलं आहे. कॉक्रोचचं असं आहे की, त्याला कुठेही फेका, तो तिथेच जन्म घेतो,’ असं हटके उत्तर दिलं. ते ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तुकाराम मुंढे म्हणाले, आवडतं स्ट्रीट फूड असं म्हणणार नाही, पण आवडत होतं. बऱ्याचदा कंडिशनमध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मी कॉलेजला असताना प्रॉपर जेवण मिळत नव्हतं. मेस लावू शकत नव्हतो. तेव्हा अशी व्यवस्था केली होती. संभाजी नगरला रस्त्यावर ऑम्लेट पॉवच्या गाड्या असतात. अप्सरा, आंबा टॉकीजच्या समोर ऑम्लेटच्या गाड्या लागायच्या. मला ऑम्लेट माहीत नसायचं. तिथे पहिल्यांदा खाल्लं. भावाने गाडीवाल्याला सांगितलं हा जेव्हा येईल तेव्हा ऑम्लेट द्या. मी पैसे देईन. त्यामुळे ऑम्लेट खायची चटक लागल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र,आता दोन महिन्यांपासून तेही खाणं बंद केल्याचं म्हटलं.

त्यावेळी फरसाण आणि केळी खायचो. तेव्हा तो प्रकार फेमस होता. आता मी खाल्लं तर दोन तासात मी बोलू शकणार नाही. आता विचार करतो. तेव्हाचं तेल कसं असेल. त्यावेळी स्ट्रीट फूड आवडायचं. आता कोणतं आवडत नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापासून मी खात नाही, असंही मुंढे यांनी सांगून टाकलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT