Shalarth ID Scam : जिल्हाधिकाऱ्यांनंतर बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही अटक होणार? तब्बल 170 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Education Officer Kiran Kuwar : बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जळगावचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी आणि सध्या बीडच्या योजनेच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या किरण जयप्रकाश कुवर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
Education Officer Kiran Kuwar's bail application has been rejected in the alleged bogus Shalarth ID scam case.
Education Officer Kiran Kuwar's bail application has been rejected in the alleged bogus Shalarth ID scam case.Sarkarnama
Published on
Updated on

Education Officer News : शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणार्‍या तब्बल 150 ते 170 कोटी रूपयांच्या बोगस शालार्थ आयडी आणि बनावट वैयक्तिक मान्यतेच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी, जळगावचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी आणि सध्या बीडच्या योजनेच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या किरण जयप्रकाश कुवर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

यापूर्वी बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ मे २०२६ रोजी लातूरमधून अटक करण्यात आली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात व मावेजा वाटपात झालेला सुमारे २४१ कोटी रुपयांचा अपहार आणि बनावट आदेशांच्या प्रकरणात ही कारवाई विशेष एसआयटी (SIT) पथकाद्वारे करण्यात आली आहे. आता बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही अटकेची टांगती तलवार आहे.

नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार मार्च 2019 ते जून 2025 या कालावधीत नाशिक विभागात शिक्षण विभागातील अधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि दलालांनी संगनमत करून 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार केले.बनावट मान्यता आदेशांच्या आधारे शासकीय तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचे वेतन आणि थकबाकी लाटून सरकारची मोठी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेनुसार संघटित गुन्हेगारीचे कलम लावून व्यापक तपास सुरू आहे.

Education Officer Kiran Kuwar's bail application has been rejected in the alleged bogus Shalarth ID scam case.
Shalarth Scam: शिक्षण क्षेत्र हादरलं! माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक! सरकारला 160 कोटींचा चुना; SIT च्या रडारवर 1200 जण

तपासादरम्यान किरण कुवर यांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील 11 शिक्षकांच्या बनावट मान्यता व शालार्थ आयडी तयार झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी प्रणालीचा गैरवापर, कागदपत्रांमधील फेरफार आणि आर्थिक घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपीची पोलिसांच्या कोठडीत चौकशी (कस्टडीयल इंट्रोगेशन) अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Education Officer Kiran Kuwar's bail application has been rejected in the alleged bogus Shalarth ID scam case.
Shalarth ID Scam : रामदास आठवलेंचा नेता 160 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड! वेबसाईट हॅक करत शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्रं; धक्कादायक माहिती आली समोर

न्यायालयाने काय म्हटले?

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार हा देशाच्या पायावर आघात करणारा पांढरपेशा गुन्हा आहे. तपासाच्या या टप्प्यावर पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरोपीला अटकपूर्व जामीन संरक्षण देणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने किरण कुवर यांचा अर्ज फेटाळून लावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com