Indapur Gram Panchayat Election Result Sarkarnama
पुणे

Gram Panchayat Election : इंदापुरात पराभूत उमेदवाराचा हवेत गोळीबार; पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Indapur Crime News : या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आलेली आहेत.

​राजकुमार थोरात

Indapur News : ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून इंदापूर तालुक्यातील काझड येथे उमेदवाराने हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी उमेदवार आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. (In Indapur, the losing candidate in the Gram Panchayat election was shot in the air)

राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे (दोघेही रा. काझड, ता, इंदापूर, जि, पुणे) यांच्यावर पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगून गोळीबार करणे आणि पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंदापूर तालुक्यातील काझड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राहुल चांगदेव नरुटे हा प्रभाग चारमध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलकडून उभा होता, तर समीर मल्हारी नरुटे याने अपक्ष निवडणूक लढवली होती. ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. ५ नोव्हेंबर) चुरशीने मतदान झाले आणि सोमवारी (ता. ६ नोव्हेंबर) निकाल जाहीर झाला. दोघांचाही या निवडणुकीत पराभव झाला.

निवडणुकीत झालेल्या पराभवातून राहुल नरुटे याने सोमवारी सायंकाळी गावातील चौकात पिस्तुलामधून गोळीबार केला. गोळीबार करून त्याने गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना पोलिसांना कळताच वालचंदनगर पोलिस ठाण्याचे हवालदार गणेश काटकर, गुलाब पाटील, शैलेश स्वामी, बापू मोहिते हे काझडमध्ये घटनास्थळी गेले.

पोलिस आल्याचे पाहताच या दोघांनी चारचाकी गाडीतून पलायन केले. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. पुढच्या चौकात पोलिसांनी त्या दोघांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी पोलिसांच्या अंगावर चारचाकी घालत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, राहुल नरुटे आणि समीर नरुटे या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आलेली आहेत. त्या दोघांविषयी माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे. माहिती कळविणाऱ्याचे नाव पुढे आणले जाणार नाही, असे वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षकयांनी स्पष्ट केले. पोलिस हवालदार गणेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT