Mushrif Vs Pawar : मुश्रीफांचे रोहित पवारांना चॅलेंज; ‘त्या’ कंपनीशी संबंध सिद्ध झाल्यास मंत्रिपद सोडून राजकीय संन्यास घेईन

Hasan Mushrif News : रोहित पवारांचं प्रेम आमच्यावर उफाळलेलं आहे, त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत असतील.
Rohit Pawar-Hasan Mushrif
Rohit Pawar-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ब्रीक्स कंपनीशी माझा आणि माझ्या जावयाचा कोणताही संबंध नाही. आजही त्या कंपनीशी माझा संबंध सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार रोहित पवार यांना दिले. (Hasan Mushrif's challenge to MLA Rohit Pawar)

हसन मुश्रीफ यांच्या जावयाची बेनामी कंपनी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कारवाई झाली. त्यानंतर सरकार आता पुन्हा त्या कंपनीला टेंडर देत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला. त्या आरोपाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी रोहित पवारांनाच खुले आव्हान दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar-Hasan Mushrif
Maratha Reservation : 'मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरंच सांगतात अन्‌ मंत्री आता वेगळंच बोलताहेत...'

मुश्रीफ म्हणाले की, ब्रीक्स कंपनीशी आमचा संबंध आहे, हे सक्तवसुली संचालनालय (ईडी) सिद्ध करू शकले नाही, ना प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स), ना लोकायुक्त सिद्ध करू शकले. आजही आपला त्या कंपनीशी कसलाही संबंध नाही. रोहित पवारांचं प्रेम आमच्यावर उफाळलेलं आहे, त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत असतील.

ब्रीक्स ही पुण्यातील कंपनी आहे. एक सहकारी साखर कारखाना त्यांना चालवण्यासाठी दिला होता. त्यांनी आठ वर्षे तो साखर कारखाना चांगला चालवला. त्यानंतर ते सोडून गेले, इतकाच माझा त्या कंपनीशी संबंध आहे, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी काय वक्तव्य केले, याची मला काहीही माहिती नाही.

छगन भुजबळ हे अनेक वर्षे ओबीसीचे नेतृत्व करत आहेत. त्यांची काही मतं असतील. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्या काय भावना आहेत, हे समजून घेतील. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी त्यांची तीव्र भावना आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनातही त्यांनी तसं नमूद केलेलं आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar-Hasan Mushrif
Beed News : क्षीरसागरांच्या घरासमोर जमाव जमताच बीडच्या एसपींना मी ८ ते ९ वेळा फोन केला, मात्र...; जयंत पाटलांचा आरोप

मुश्रीफ म्हणाले की, मराठा आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा संपूर्ण पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेना सोडून शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भुजबळांच्या भावना जाणून घेतील आणि त्यावर तोडगा काढतील, असा मला विश्वास आहे.

Rohit Pawar-Hasan Mushrif
Solapur Kunbi Certificate : सोलापुरातील करमाळ्यात ५९९, तर माढ्यात २४२ मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com