Jagdish Mulik
Jagdish Mulik Sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha Constituency Election : मुरलीअण्णांच्या सेलिब्रेशनचे प्लॅनिंग अन् जगदीश मुळीकांची हाताची घडी!

सरकारनामा ब्यूरो

Pune Lok Sabha Election Result and BJP : पुण्यात भाजपसाठी एकतर्फी वाटलेला लोकसभा निवडणुकीचा सामना धंगेकरांच्या ताकदीने नेतृत्वाची चिंता वाढवणारा ठरला. या निवडणुकीत मोहोळांना चितपट करण्याचा धंगेकर आणि पर्यायाने मोजक्या काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न राहिला. मात्र भाजपच्या बलाढ्य ताकदीपुढे धंगेकरांना त्यांच्या मागे कसेबसे उभे राहिलेल्या काँग्रेसचा निभाव लागणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून पुढे आला. अर्थात पुणे शहरात मुरलीधर मोहोळ यांचेच नेतृत्व राहील असेच या निमित्ताने आता तरी दिसून आले आहे.

पुण्यात मोहोळ की धंगेकर याचा फैसला 35-40 तासांत होईल. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला आनंदाची भरती आली आहे. तर या पराभवाने धंगेकरांना नव्हे काँग्रेसला ओहोटी येऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहळांचा विजय झाल्यास भाजप नेतृत्वाला आनंद होईलच पण त्यांच्या 'लीड' (मताधिक्य) आकडेमात्र अनेकांची चिंता वाढवणारे ठरतील. हेच आकडे नेतृत्वाची चिंता वाढवतील पण मोहोळ हे खासदार झाल्याने स्वपक्षातील भाजपमधील मोहोळाच्या विरोधकांचीही डोकेदुखी ही वाढू शकते. म्हणजे लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या भाजपमधील काही इच्छुकांना मोहोळांचा विजय सतावू शकतो.

कारण, मोहोळ खासदार झाल्यास त्यांच्या नेतृत्वात काम करावे लागेल आणि पुढील काही वर्षे लोकसभेसाठी आपल्याला संधी मिळणार नाही, असा हिशेब भाजपमधील मोहोळ विरोधकांचा असावा.

मोहोळांसोबतच माजी आमदार जगदीश मुळीक(Jagdish Mulik), माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर यांच्यासह काहीजण इच्छुक होते. मात्र या इच्छुकांमध्ये जगदीश मुळीक हे सुरुवातीस आघाडीवर असल्याचे बोलले गेले. पण उमेदवारीची बाजी मोहोळांनी जिंकली आणि जगदीश मुळीक नाराज झाले. त्यावरून भाजपात बरेच रामायण घडल्याची चर्चा आहे.

अशातच वडगाव शेरीतून कोणाल लीड मिळणार याची चर्चा आहे. तेव्हाच मुळीक ऐन निवडणुकीतही नाराज होते असे बोलले गेले. मोहोळ्यांच्या उमेदवारीपासून नाराज असलेले मुळीक यांनी मोहोळांसाठी वडगाव शेरीत जोरात काम केल्याचे दावे केले जात आहे. आता एक्झिट पोलच्या अंदाजानानंतर आणि मतमोजणीस दोन दिवस बाकी असताना प्लॅनिंग केले जात आहे. त्यासाठी जगदीश मुळीक यांनी हजेरी लावली आणि मीटिंगमधील त्यांच्या एका फोटीची चर्चा सुरू झाली. अर्थात मोहोळांच्या सेलिब्रेशनसाठी(मतमोजणी) घेतलेल्या मीटिंगमध्ये जगदीश मुळीक हे हाताची घडी घालून बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोहळांच्या सेलिब्रिशन आधी जगदीश मुळीकांच्या हाताची घडी चर्चेचा विषय ठरू शकते.

भाजपसाठी पुणे मतदारसंघ महत्त्वाचा राहिला आहे. या मतदार संघातून दिल्लीत कोण जाणार याची उत्सुकता होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा आधी झाली. पाठोपाठ सुनील देवधरांचेही चर्चेत आहे आणि मग पुण्यातील स्थानिक नेते म्हणून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, संजय काकडे, माधुरी मिसाळ यांची नावे पुढे आली. शेवटच्या क्षणी अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळांचे नाव निश्चित झाले आणि लोकसभेसाठी कसरत केलेल्या मुळीकांचे नाव बाजूला पडले.

...हे मुळीकांनी हेरले होते पण -

साहजिकच मुळीक नाराज झाल्याच्या कंड्या पिकवल्या गेल्या. त्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहळांनी मुळीक यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्या पाठोपाठ राज्यातील बड्या नेत्यानेही मुळीकांच्या नाकदुऱ्या काढल्याचे समजते. त्यामुळे मोहोळ यांच्याप्रचारासाठी जगदीश मुळीक सक्रीय झाले. वडगाव शेरीत प्रचंड रॅलीही काढली पण फडणवीसांकडे 'सेटींग' करून पुणे लोकसभेचं तिकीट मिळवण्याची मुळीकांची व्यूव्हरचना होती, ती सफल ठऱली नाही. महायुतीच्या राजकारणात वडगाव शेरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने आता आपल्याला पुणे लोकसभा मतदारसंघात संधी आहे हे मुळीकांनी हेरले होते पण मोहोळांमुळे त्यांना संधी मिळाली नाही.

अशातच आता मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारीही समोर आली. त्यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार असल्याचे दिसत आहे. तर राज्यात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीची आकडेवारी ही काँटे टक्कर दाखवत आहे. तरीही राज्यातील सर्वात मोठा पक्ष हा भाजच दिसून येत आहे आणि पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे जिंकतील हे एक्झिट पोलमधून समोर आले आहे. मात्र, त्यांचे 'मार्जिन' किती असेन, याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT